Sunday, 5 July 2015

गीतारहस्य शताब्दीनिमित्ताने निबंध स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी – लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून शताब्दी साजरी करण्याचा निर्णय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
       स्पर्धेचे गटवार विषय असे :  पहिला गट (खुला आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी) – लोकमान्य टिळकांचे लेखन आणि संशोधन. दुसरा गट (कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी) – गीतेचे महत्त्व आणि लोकमान्य टिळकांची भूमिका, तिसरा गट (आठवी ते दहावी) – लोकमान्य टिळक जीवनदर्शन. पहिल्या गटातील विजेत्यांना 750, 500 आणि 250 रुपये, दुसऱ्या गटाला 500, 300 आणि 200 रुपये, तर तिसऱ्या गटाच्या विजेत्यांना अनुक्रमे 300, 200 आणि 100 रुपयांची बक्षिसे दिली जातील. स्पर्धेकरिता येत्या 20 जुलैपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, गणपती मंदिरासमोर, टिळक आळी, रत्नागिरी या पत्त्यावर निबंध पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
       दरम्यान, येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गीतारहस्याचा सांगोपांग परिचय करून देणारे चर्चासत्र रत्नागिरीच्या गीता भवनात आयोजित करण्यात आले आहे. निवडक 100 अभ्यासकांनाच चर्चासत्राला प्रवेश दिला जाणार असून इच्छुकांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा.संपर्क - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टिळक आळी, रत्नागिरी फोन (02352) 221701


No comments:

Post a Comment