रत्नागिरी – शहराजवळील पोमेंडी
खुर्द (काजरघाटी) येथील मठात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींच्या पादुका
आहेत. मठात दरवर्षीप्रमाणे आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे येत्या शुक्रवारी (ता. १७) पुण्यतिथी उत्सव साजरा केला
जाणार आहे. यंदा १०१ वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उत्सवानिमित्ताने गेल्या १० जुलैपासून श्री गुरुचरित्र वाचन
सुरू आहे. पुण्यतिथीदिनी १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्रींच्या पादुकांची षोडशोपचार महापूजा आणि अभिषेक, सकाळी ११ त दुपारी १ या वेळेत यतिअर्चा, तीर्थराजजपूजन, आरती, मंत्रपुष्प, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पुण्यातील हभप पुंडलिकबुवा
हळबे यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ७ वाजता श्रींची पूजा आणि आरती, मंत्रपुष्प होईल.
या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी
उपस्थित राहावे, असे आवाहन श्री टेंब्ये स्वामी पादुका मठ भजन मंडळाने केले आहे.
No comments:
Post a Comment