रत्नागिरी - येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर
वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (ता. ७ नोव्हेंबर) शिक्षणतज्ज्ञ,
माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी केले. बच्चे कंपनी आणि मोठ्यांसाठी खास
प्रकाशित होणारे बहुतांशी दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दिवाळी अंकांची
शतकमहोत्सवी परंपरा महाराष्ट्राला आहे. शेकडो दिवाळी अंक मराठीत प्रकाशित होतात.
त्यातील बहुतांशी अंक उपलब्ध करून देण्याकडे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा
प्रयत्न असतो. यंदाच्या प्रदर्शनात ७० अंक आहेत. मासिक १५० रुपये वर्गणी आणि १५०
रुपये अनामत अशी ३०० रुपये सभासद नोंदणी भरून अंक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
बालवाचकांसाठीही खास दिवाळी अंक आहेत. अंक वाचनासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाणार
आहे.
उद्घाटनप्रसंगी
वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, कार्यवाह चंद्रशेखर
पटवर्धन, कार्यकारिणी सदस्य मालती खवळे यांच्यासह वाचक प्रतिनिधी उपस्थित होते.
रत्नागिरीतील
सुजाण वाचकांनी जास्तीत जास्त अंकांचा लाभ घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
No comments:
Post a Comment