रत्नागिरीत उद्घाटन : आंतरराष्ट्रीय मास्टर, महिला फिडेमास्टरचा समावेश
रत्नागिरी
: चेसमन संस्था आयोजित भारताचे पहिले बुद्धिबळ चँपियन (कै.) आर. बी. सप्रे स्मृती फिडे
जलद बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सप्रे यांच्या ९८ वर्षीय पत्नी सुधा सप्रे यांनी
केले. आजपासून नाचणे-पॉवरहाऊस येथील दैवज्ञ भवनमध्ये स्पर्धा सुरू झाली. चौथ्या फेरीअखेर
नारायणन् श्रीनाथ, अमेय ऑडी, राकेश कुलकर्णी, राहुल संगमा,
कांतिलाल दवे,
सोहन फडके
यांच्यासह अन्य सहा खेळाडू आघाडीवर होते.
स्पर्धेत महाराष्ट्र,
कर्नाटक,
मध्य प्रदेश,
कर्नाटक,
गोवा,
गुजरात,
राजस्थान,
तमिळनाडू आदी
राज्यांतील २२६ खेळाडू सहभागी झाले आहेत. तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर
नारायणन् श्रीनाथ, मध्य प्रदेशचा आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा,
महिला फिडेमास्टर
ऋचा पुजारी, कँडेडमास्टर विनोद भागवत, ठाण्याचे नूबेरशहा शेख,
राकेश कुलकर्णी,
हेमंत शर्मा,
सोहन फडके,
स्नेहल भोसले,
एस. सॅमसन,
पुण्याचा प्रतीक मुळ्ये,
गोव्याचा अमेय आडी,
मुंबईचा सी. एस.
उन्नी, राजस्थानचा कांतिलाल दवे, कोल्हापूरचा अनिश गांधी,
सम्मेद शेट्ये,
अचल रस्तोगी,
मुंबईचा हर्ष घाग,
संजीव नायर,
पुण्याचा सुनील
वैद्य, रोहन जोशी, रवींद्र नरगुंदकर, गोव्याचा विल्सन क्रूझ,
पुण्याचा सोहम दातार,
रत्नागिरीचे विनय
गांधी यांच्यासह ११६ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू यामध्ये खेळत आहेत.
उद्घाटनप्रसंगी
मोहन सप्रे, सौ. मंगला सप्रे, सौ. शुभांगी पोळ,
डॉ. प्रबोध पोळ,
डॉ. अंजली मायदेव
यांच्यासह चेसमनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, उपाध्यक्ष अॅड.
विनय गांधी, सचिव दिलीप टिकेकर, स्पर्धा समन्वयक व केजीएन सरस्वती
ङ्काउंडेशनचे दिलीप नवरे, रायगड चेसमन असोसिएशनचे अध्यक्ष विलास
म्हात्रे, चिफ ऑर्बिटर भरत चौगुले, कèहाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष चंद्रकांत
हळबे आदी उपस्थित होते. यंदा सप्रे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या
स्पर्धेस महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रज्ञेश देवस्थळी यांनी सूत्रसंचालन केले.
..................
६ ते ८२ वयोगटाचे खेळाडू
स्पर्धेत सहा वर्षांच्या आदिती जाधवपासून ८२ वर्षांचे एल. पी. खाडिलकर
अशा सर्व वयोगटातील खेळाडूंनी भाग घेतला आहे. रत्नागिरीकरांना बुद्धिबळपटूंचा
रणसंग्राम पाहावयास मिळत असून,
अनेकांची
गर्दी होत आहे. रामचंद्र सप्रे यांचा नातू देवेंद्र मायदेव स्पर्धेत खेळत आहे.
उद्या (ता. २९ नोव्हेंबर) दिवसभरात चार फेèया होणार असून,
दुपारी
४ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धेत खेळताना खेळाडू |
No comments:
Post a Comment