१४ ते १९ नोव्हेंबर : रजनी जोशी, अरविंद पिळगावकर यांचे मार्गदर्शन
अरविंद पिळगावकर |
रत्नागिरी : संगीत रंगभूमीची वैभवशाली परंपरा पुढे
जाण्यासाठी व संगीत रंगभूमीवर नवीन कलाकार यावेत व त्यांना संगीत नाटकांचे योग्य
प्रशिक्षण मिळण्यासाठी खल्वायन संस्थेने संगीत नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित
केली आहे. १४ ते १९ नोव्हेंबर या काळात होणाèया कार्यशाळेत
५० वर्षांचा दांडगा अनुभव असणारे कलाकार अरविंद पिळगावकर व श्रीमती रजनी जोशी मार्गदर्शन
करणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जोशी पाळंद
येथील (कै.) ल. वि. केळकर वसतीगृहाच्या सभागृहात कार्यशाळा होईल. कार्यशाळेला
ङ्किनोलेक्स इंडस्ट्रीजने प्रायोजकत्व दिले आहे. कार्यशाळा विनामूल्य आहे. मात्र
प्रवेश मर्यादित आहे. इच्छुक विद्याथ्र्यांनी १० नोव्हेंबरपर्यंत खल्वायनचे
श्रीनिवास जोशी (९४०४३३२७०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे
आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
संगीत नाटकामध्ये एखाद्या भूमिकेचा अभिनय कसा करावा,
नाट्यपद, भूमिका साकारत असताना कस सादर करावे,
गद्य व संगीत याचा मिलाङ्क कसा करावा याचे मार्गदर्शन व संगीत
नाटकात विविध गानप्रकार कसे वापरले
गेले याचे विवेचन त्या अनुषंगाने विविध रस असलेल्या नाट्यपदांचे अभिनयासकट
सादरीकरण कसे करावे यासंबंधीचे मार्गदर्शन कार्यशाळेत केले जाणार आहे.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवाशी १९ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत
कार्यशाळेतील सहभागी विद्याथ्र्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
रजनी जोशी |
श्रीमती रजनी जोशी या व्यावसायिक संगीत रंगभूमीवर १९६३
पासून कार्यरत आहेत. संगीत स्वयंवर, सौभद्र,
संशयकल्लोळ, मृच्छकटिक, एकच
प्याला, मानापमान, पुण्यप्रभाव,
मंदारमाला या नाटकातून त्यांनी नायिकेच्या भूमिका गाजवल्या आहेत.
याशिवाय तुज आहे तुजपाशी, करीन ती पूर्व, भाऊबंदकी, बेबंदशाही या गद्य नाटकांतूनही त्यांनी भूमिका
केल्या आहेत. सर्व मिळून १७ हजार प्रयोगांतून भूमिका साकारल्या आहेत. पद्मश्री डॉ.
दाजी भाटवडेकर यांच्याकडून त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. तसेच वामनराव
सडोलीकर, गोविंदराव अग्नी, निवृत्तीबुवा
सरनाईक, माणिक वर्मा या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय
संगीताचे मार्गदर्शन मिळाले आहे. नाट्यसंगीताचे प्रशिक्षण त्यांना कृष्णराव घाणेकर,
मा. अनंत दामले, पं. जितेंद्र अभिषेकी
यांच्याकडून त्यांना मिळाले आहे. पं. राम मराठे, छोटा गंधर्व,
नारायण बोडस, प्रकाश घांग्रेकर, रामदास कामत, अरविंद पिळगावकर या गायक नटांबरोबर
त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळावर
त्या ९ वर्षे होत्या. विद्याधर गोखले प्रतिष्ठानतर्फे दोन वर्षांच्या नाट्यसंगीत
प्रशिक्षण अभ्यासक्रमात, प्रशिक्षक या नात्याने २००८ पासून
त्या नाट्यसंगीत शिकवत आहेत. अमेरिका, इंग्लंड, दुबई, qसगापूर या देशात त्यांचे संगीत, रंगभूमीविषयक कार्यक्रम झाले आहेत. जागतिक मराठी परिषदेमध्ये महाराष्ट्र
सरकारच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी भूमिका निभावलेली आहे. संगीत रंगभूमीचा
आधुनिक अवतार हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र शासनाचा बालगंधर्व
पुरस्कार, संगीत रंगभूूमीच्या प्रदीर्घ सेवेबद्दल विद्याधर
गोखले पुरस्कार, छोटा गंधर्व, राम मराठे,
माणिक वर्मा पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र
भूषण पुरस्कारही मिळाला आहे.
अरविंद पिळगावकर यांनी १९६४ साली रंगभूमीवर पदार्पण
केले. १९६७ साली सं. वासवदत्ता हे त्यांचे संगीत रंगभूमीवरील पहिले नाटक. आजवर
त्यांनी सं. स्वयंवर, विद्याहरण, सौभद्र,
मानापमान, संशयकल्लोळ, धाडीला
राम तिने का वनी, मृच्छकटिक, कान्होपात्रा,
बावनखणी, शारदा, वसंतसेना,
पुण्यप्रभात, भावबंधन आदी नाटकांतून गायक नट
म्हणून भूमिका केल्या. पं. के. डी. जावकर, पं. अभिषेकी,
पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडून गायनाचे तसेच डॉ. दाजी भाटवडेकर
यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण त्यांना मिळाले. बालगंधर्व, पं.
अभिषेकी, पं. दीनानाथ मंगेशकर रंगगौरव, प्रदीर्घ नाट्य सेवा गौरव, केशवराव भोसले आदी
पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही मिळाला
आहे.
No comments:
Post a Comment