लांजा : सन
१८५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी झाशीची राणी
लक्ष्मीबाई हिची १८१ वी जयंती येत्या गुरुवारी (ता. १९ नोव्हेंबर) कोट येथे विविध
कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. झाशीच्या राणीचे माहेर आणि सासर लांजा
तालुक्यातच कोलधे आणि कोट येथे असून तेथील ग्रामस्थांनी राणी लक्ष्मीबाई स्मारक
समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत राणीची जयंती साजरी केली जाणार आहे. दोन
सत्रांमध्ये होणाऱ्या या समारंभात सकाळी कोट येथे स्मारक उभारण्याबाबत तसेच
राणीविषयीच्या आठवणी, वस्तूंचे जतन करण्याबाबत निमंत्रितांचे चर्चासत्र होणार आहे.
दुपारच्या सत्रात इतिहास आणि
क्रांतिकारकांविषयीचे गाढे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. या
कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर
संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment