रत्नागिरी – सीएस फाउंडेशन, सीए सीपीटी व लॉ सीइटी या
परीक्षांसाठी रत्नागिरीत प्रथमच ऑनलाइन टेस्ट सिरीजच्या सुविधेचा लाभ अचीव्हर्स
ॲकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या उत्तम
सहकार्यामुळे अचीव्हर्स ॲकॅडमी यशस्वीपणे तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. २०१६
मध्ये सीएस कोर्ससाठी सुरू झालेल्या ॲकॅडमीने आता सीएचा अभ्यास करणाऱ्या
विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सीएस फाउंडेशन,
सीएस एक्झिक्युटिव्ह आणि
सीएस प्रोफेशनल या परीक्षांच्या जून व डिसेंबर २०१८साठीच्या ॲडमिशन्स सुरू झाल्या
आहेत. तसेच सीएसीपीटी व आयपीसीसी या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठीदेखील प्रवेश
सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी प्रवेशसंख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा. जे विद्यार्थी जून २०१८मध्ये सीएसीपीटी हि
परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी लॉ आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे मार्गदर्शन मार्च महिन्यापासून
सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांना सीपीटीच्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन टेस्ट
सिरीजदेखील देता येणार आहे. विद्यार्थ्यांकरिता तज्ज्ञ शिक्षकांच्या नोट्सही
दिल्या जातील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या
सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लासच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे. संपर्क :
८२३७७५३०३६, ८३८००६९३२०, ९४०४९१७०५६.
No comments:
Post a Comment