Sunday, 7 January 2018

पहिल्या इंग्रज अधिकाऱ्याला मारून चापेकर बंधूंनी इतिहास रचला – चारुदत्त आफळे

कीर्तनसंध्या चतुर्थ पुष्प


 रत्नागिरी-  कीर्तनसंध्या महोत्सवात गणपतीपुळे येथील जीवरक्षकांचा सत्कार चारुदत्त आफळेबुवा यांनी केला. दुसर्‍या छायाचित्रात गोरक्षक मुकेश गुंदेचा यांचा सत्कार करताना आफळेबुवा.

      रत्नागिरी : रँडसाहेबाचा खून ही भारतात इंग्रज अधिकाऱ्याला मारण्याची ही पहिलीच वेळ होती. चापेकर बंधूंच्या या ऐतिहासिक कृत्यामुळे इंग्रज घाबरले. पण अनेक भारतीय क्रांतिकारकांनी त्यातून प्रेरणा घेतली, असा इतिहास राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी विदित केला.
      रत्नागिरीत सुरू असलेल्या सातव्या कीर्तनसंध्या महोत्सवात चौथ्या दिवशी पूर्वरंगात टिळकांच्या गीतारहस्यातील कर्मयोग समजावून सांगितला. उत्तररंगात त्यांनी ब्रिटिशांविरुद्धचा देशातला पहिला शेतकरी मोर्चा, टिळकांचे योगदान, चापेकर बंधूंचा पराक्रम मांडला. बुवा म्हणाले की, चापेकर बंधूंनी २०० युवकांची फळी तयार केली. पुण्याच्या चतुःश्रृंगी गडावर लुटुपुटूच्या युद्धातून सराव केला. लाठीकाठी, बंदुका चालवल्या. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव चापेकर या बंधूंसह महादेव रानडे यांनी जोर, बैठका व्यायामासह शरीर कमावले. मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले. आर्य धर्म प्रतिबंध निवारण मंडळ स्थापन करून पुणे, मुंबईत हिंदू धर्माची निंदा करणाऱ्यांना अद्दल घडवली. त्यामुळे ख्रिश्चआन धर्मात जाणारे हिंदू व धर्माची निंदा करणाऱ्यांना वचक बसला. प्लेगच्या साथीमध्ये इंग्रज अधिकारी रँडने हिंदूंवर अत्याचार केले. त्यावेळी चिंचवडच्या विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेक दिनी चापेकर यांनी या भारतभूमीमध्ये कुणी पुरुषच उरला नाही, हे गीत म्हटले. त्या वेळी लोकमान्य टिळकांनी त्यांना दुसर्यां चे पौरुष पाहण्यापेक्षा तुमच्यात पौरुष असते तर रँड जिवंत राहिला नसताएवढेच सुनावले. त्यानंतर चापेकरांनी प्रेरणा घेऊन कट रचला आणि व्हिक्टोरिया राणीच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या दिवशी रात्री कलेक्टरच्या बंगल्यावरून घोडागाडीतून परत जाताना रँडचा खून केला.

      महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि इंग्रजांनी अनन्वित अत्याचार सुरू केले. लोकमान्य टिळकांनी शेतकर्यांरना एकत्र केले. महाराष्ट्रात सर्वत्र रणयज्ञ सुरू करण्याचे आवाहन केले. रायगड जिल्ह्यात पेण येथे २० हजार शेतकर्यांरनी मोर्चा काढला. इंग्रज अधिकार्यावने शेतकर्यांआना अटक करून तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले. पण तेवढा मोठा तुरुंगच नव्हता. म्हणून शेतकऱ्यांना पटांगणात ठेवण्यात आले. टिळकांना हे कळताच त्यांनी पेण गाठले. शेतसारा माफ करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफत करा आणि सरकारी धान्यसाठा लोकांसाठी खुला करा या तीन मागण्या मान्य होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. ब्रिटिशांच्या विरोधातील एवढा मोठा पहिलाच मोर्चा शेतकऱ्यांनी काढला होता. त्याची दखल इंग्रज सरकारला घ्यावी लागली. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. टिळकांच्या या नेतृत्वाने ते लोकमान्य झालेच, पण चापेकर बंधूंच्या कर्तृत्वालाही उभारी मिळाली, असे आफळेबुवांनी सांगितले.
      बुवांनी कीर्तनात देह धारण असे ज्याने केला, आमुची माळियाची जात, कैवल्याच्या चांदण्याला, देव विठ्ठल, आम्ही दैवाचे शेतकरी, या भारतभूमीचे ठायी कुणी पुरुषच उरला नाही अशी अनेक पदे सुरेख म्हटली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने गायनसाथ केली. तसेच राजू धाक्रस, उदय गोखले, मधुसूदन लेले, प्रथमेश तारळकर, सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.

      गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणार्यां चे जीव वाचवणारे जीवरक्षक सूरज पवार, राज देवरूखकर, योगेश पालकर, अमेय केदार, सचिन धामणसकर, रोहित चव्हाण, अनिकेत राजवाडकर, महेश वारेकर, मिथुन माने, हेमंत गावणकर, विश्वाेस सांबरे, संजय माने, अक्षय माने, उमेश म्हादे यांना कीर्तनसंध्या संस्थेतर्फे आफळेबुवांनी सन्मानित केले. गोरक्षक मुकेश गुंदेचा यांचा विशेष गौरव झाला.
      रत्नागिरी शहराला स्वच्छता सर्वेक्षणात टॉप 20 मध्ये क्रमांक मिळण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना आफळेबुवांनी केली. तसेच कोकण स्वच्छतेची राजधानी व पर्यटनाचे केंद्र व्हावे याकरिता सदिच्छा व्यक्त केली. कीर्तनाला नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह सुमारे पाच हजार रसिक श्रोते उपस्थित होते.

      कीर्तनसंध्येच्या चौथ्या दिवशी पाच हजारांहून अधिक रसिक श्रोते उपस्थित होते. ४०० दुचाकी आणि १०० चारचाकी गाड्यांचे व्यवस्थित पार्किंग करण्यासाठी कीर्तनसंध्या परिवाराचे सदस्य मेहनत घेत होते. त्यामुळे कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही.
...........

No comments:

Post a Comment