कीर्तनसंध्या
– द्वितीय पुष्प
रत्नागिरी : इंग्रजांनी इतिहासाचे लबाडपणे लेखन
केले. पेशवाई परत येण्यासाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी बंड केले, ते दरोडे घालत होते, असा खोटा इतिहास लिहून ठेवला. त्यामुळे
काही इतिहासकार तेच पुढे लिहून समाजात तेढ निर्माण करतात. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र
व्हावे याकरिता फडके यांनी बंड केले. यांच्या लढ्याला त्यांचे सहाध्यायी महात्मा फुलेंच्या
कष्टकरी, शेतकरी, माळकरी वर्गाने मदत केली. सुधारकाचे नाव
घेऊन भांडणे सोपे आहे. पण एकत्र आणणे हे व्रत आहे. फुले यांनी सांगितले समाजाने सत्यशोधक
व्हावे. ते समजण्यासाठी खरा इतिहास जाणून घ्यावा, असे सूचक प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार
हभप चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात कीर्तनसंध्यातर्फे
काल (दि. ४ जानेवारी) दुसर्याा दिवशीच्या कीर्तनात बुवांनी क्रांतिकारक फडके व त्यांचे
बलिदान याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, फडके यांच्या आजोबांनी त्यांना लहान वयात
शिवछत्रपतींचे चरित्र शिकवले. तेव्हापासूनच त्यांच्या मनात इंग्रजांविरोधात चीड निर्माण
होत होती. दुष्काळ पडला तेव्हा ख्रिश्चचन लोक हिंदू मुले घेऊन धर्मांतर करत होती. धर्मांतराच्या
या वादळात फडके यांनी हिंदू असोसिएशन स्थापन केली. त्यात हिंदूंसह अन्य धर्मीयांच्या
मुलांनाही जागा दिली, पण त्यांचे धर्मांतर केले नाही. इंग्रजांची शिक्षणपद्धती नोकरशाही निर्माण
करत होती. त्यांनी रेल्वे आणली ती सैन्य वेळेवर पोहोचण्यासाठी. मात्र रेल्वेत बसायला
मिळावे म्हणून भारतीय नवस करत होते. गुलामाला गुलामी हेच भूषण वाटत होते. अशा काळात
फडके यांनी दहा वर्षे सैन्याच्या लेखा विभागात नोकरी केली. तेथील इत्थंभूत माहिती मिळवली.
त्यांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष खदखदत होता. म्हणूनच त्यांच्या मनात बंड
करायचे ठरत होते. त्याची तयारी त्यांनी चालविली होती. इंग्रजी, जर्मन, रशियन भाषा त्यांनी शिकून घेतल्या. स्वातंत्र्यासाठी
वेळ पडल्यास अन्य देशांची मदत घ्यावी लागली, तर उपयोगी ठरावे, म्हणून या भाषा त्यांनी अवगत केल्या. त्यातून
देशभक्तीने ते किती प्रेरित होते, स्वातंत्र्याची त्यांच्या मनात किती आस होती, त्यासाठी त्यांनी किती तयारी चालविली होती, ते लक्षात येते. नोकरीत असताना त्यांची
आई आजारी पडली व साहेबाने सुट्टी दिली नाही आणि संघर्षाला ठिणगी पडली. त्यांनी दौलतराव
रामोश्याच्या नेतृत्वाकाली रामोशांना एकत्र केले. ब्रिटिशांनी अनेकांची वतने रद्द केल्याने
त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. रामोशी त्यापैकीच होते. त्यांच्याकडून किल्ल्यांच्या
संरक्षणाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर पारधी, कातकरी, वडार अशा अनेक जमातींची नावे लुटारूंच्या
यादीत समाविष्ट करण्यात आली होती. कोठेही दरोडा पडला, तरी याच जमातीच्या लोकांना अटक केली जात
असे. त्यामुळे अशा जमाती ब्रिटिशांच्या विरोधात होत्या. त्यांना फडक्यांनी संघटित केले.
इंग्रजांच्या चांगल्या बंदुका खराब झाल्या, असे सांगून इंग्रजांच्याच कामगारांनी फडके
यांना त्या मिळवून दिल्या. स्वराज्यासाठी लागणार्याा पैशांसाठी दरोडे घातले. पण जे
सावकार पिळवणूक करत होते, त्यांच्यावरच दरोडे घातले व फक्त निम्मे पैसे, सोने-नाणे मिळवले. पण हे स्वराज्यासाठी
घेत आहे, स्वराज्य
मिळाले की परत देऊ अशी पावतीही फडके देत होते. स्त्रिया, मुलांना त्रास देऊ नये, अशी कडक नियमावली बनवली होती.
फडके लढवय्ये होते. तलवार दातात पकडून गिर्यारोहण
करणे,
घोडेस्वारी, दांडपट्टा दातात धरून दरी उतरणे, बंदुका चालवणे अशा अनेक शारीरिक कसरतींमध्ये
ते माहीर होते. बंदुका चालवण्याचे व लाठीकाठीचे वर्ग ते घेत होते. इंग्रजांविरोधात
लढायला सैनिक तयार करत होते. त्यांच्या वर्गात लोकमान्य टिळक हेसुद्धा होते. लढ्यामध्ये
ब्रिटिश पोलिसांना फडके यांना पकडणे शक्य झाले नाही. तेव्हाच्या महाराष्ट्रातील २१
पैकी ७ जिल्ह्यांवर फडक्यांनी वर्चस्व निर्माण केले. अवघ्या पाच महिन्यांत ही किमया
त्यांनी साधली. पाच महिन्यांनंतर कर्नल डॅनियल या लष्करी अधिकार्यारने त्यांना पकडले.
फडके यांना पकडण्यासाठी त्याने ४ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते व त्याला उत्तर
म्हणून फडके यांनी मुंबईच्या गव्हर्नरचे मुंडके कापेल त्याला ९ हजार रुपयांचे इनाम
जाहीर केले. यामुळे इंग्लंडच्या वृत्तपत्रातही फडके यांचा डंका वाजला. पकडल्यानंतर
कोर्टाने त्यांची एडनच्या तुरुंगात रवानगी केली. तेथे क्षयाने त्यांचा २३ फेब्रुवारी
१८७९ रोजी मृत्यू झाला. पण फडके यांच्या वीरमरणाने अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली.
वासुदेव बळवंत फडके लुटारू होते, असा अपप्रचार केला जात असे. फडक्यांनी लूट केली हे खरे, पण ती स्वराज्यासाठी नव्हे. त्यांच्या बाजूने
लढणाऱ्या भारतीय
नको देवराया अंत आता पाहू, १८७९ चे साल वासुदेवाचे वीर फिरतात, धाव धाव दत्ता आदी पदे बुवांनी ऐकवली. त्यांना
तालवाद्यसाथ सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई यांनी केली. मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ
मिळाली.
.........................
कीर्तनात
रंगून गेलेल्या चारुदत्त आफळेबुवांच्या विविध भावमुद्रा
No comments:
Post a Comment