Tuesday, 8 December 2015

रासरंग कार्यक्रमाने रत्नागिरीकर श्रोते उपशास्त्रीय संगीतात न्हालेरत्नागिरी : उपशास्त्रीय संगीतामधील दादरा, गझल, ठुमरी, चैती आदी नावीन्यपूर्ण व राग, थाटामध्ये रचलेल्या व विविध भावना व्यक्त करणाऱ्या गीतांनी रत्नागिरीकर श्रोत्यांना रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने आगळी संधी उपलब्ध करून दिली. प्रख्यात गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या रासरंग कार्यक्रमाने श्रोते उपशास्त्रीय संगीतात न्हाऊन गेले. शास्त्रीय, सुगम, भावगीतांपेक्षा वेगळ्या धाटणीचा हा कार्यक्रम श्रोत्यांच्या पसंतीस उतरला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात रासरंग कार्यक्रमात
गायन करताना सौ. मुग्धा भट-सामंत. शेजारी श्रीरंग भावे व
सौ. विनया परब. वाद्यसाथ हेरंब   जोगळेकर, उदय गोखले,
 वैभव ङ्कणसळकर आणि मधुसूदन लेले, निवेदिका सौ. पूर्वा पेठे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांच्यासमवेत श्रीरंग भावे आणि सौ. विनया परब यांनीही गायन करून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कल्लापाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक केतन शेट्ये, वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, कार्यवाह चंद्रशेखर पटवर्धन आणि गायकांनी सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन केले. अ‍ॅड. पटवर्धन यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले.
दीपप्रज्वलन करताना कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे
केतन शेट्ये. शेजारी अ‍ॅड. दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन आदी.
सौ. सामंत यांनी अखिया न डारो या गीतीने सुरवात केली व त्यानंतर केसरियां बालमा हा दादरा ऐकवला. त्यानंतर कब लो मैं रहूं खडी हे गीत श्रीरंग भावे यांनी ऐकवले. ऐकवून उपशास्त्रीय संगीतातील प्रकार ऐकवला. सौ. सामंत यांनी कारे कारे बादल, चैतर मासे घर आयो, होरी होरी होरी खेलत, धिरके आयी बदरियाँ, हुजूर इतन अगर, लई झुलन की, सावन की ऋतू, झुले झुले बगिया में, qबदिया का रंग, सुन्या सुन्या आदी विविध भावांनी रंगलेली गीते ऐकवून रसिकांची वाहवा मिळवली. तर श्रीरंग भावे आणि सौ. परब यांनीही गीते ऐकवली.
श्रीरंग भावे
कार्यक्रमात सौ. पूर्वा पेठे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. हेरंब जोगळेकर यांनी तबलासाथ, मधुसूदन लेले यांनी हार्मोनियम, उदय गोखले यांनी व्हायोलिन, वैभव ङ्कणसळकर यांनी qसथेसायजरसाथ केली.
 कार्यक्रमास रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. रत्नागिरीत सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्याकरिता सातत्याने नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल व वाचनालय त्यात योगदान देईल, असे असे अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी या वेळी सांगितले.

सौ. विनया परब
 

No comments:

Post a Comment