Thursday 10 December 2015

‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चे दुसरे पर्व १३ डिसेंबरपासून

छोटे तानसेन’ ‘कानसेनांनास्वरमुग्ध करणार

       रत्नागिरी : कोकणातील बालकलाकारांना ग्लॅमरस दुनियेची अनुभूती मिळावी, या हेतूने गेल्या वर्षापासून लिटील व्हॉइस ऑफ रत्नागिरीही १० ते १६ वयोगटातील मुलांसाठी गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सीझन २ मधील प्राथमिक फेऱ्यांची सुरुवात येत्या १३ डिसेंबरपासून चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक हॉल येथून होणार आहे.
आकर्षक रंगमंच, नेत्रदीपक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था यासोबतच नामवंत कालाकारांच्या वाद्यवृंदातील साथीने आपल्या गळ्यातील स्वर आळवण्याची अमूल्य संधी या स्पर्धेच्या निमित्ताने या बालकलाकारांना मिळणार आहे. आयोजक मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्सआणि दिल से क्रिएशन्सया रत्नागिरीतील नामवंत संस्थांमुळे एक अप्रतिम इव्हेंट रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे.
मोठ्या शहरांमधील कलाकारांना जी संधी मिळते तशी संधी कोकणच्या कलाकारांना मिळावी यासाठी मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्सचे अभिजित गोडबोले नेहमीच प्रयत्नशील असतात. हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि उद्योजक किरणशेठ सामंत यांच्या प्रेरणेतून आणि अभिजित गोडबोले यांच्या संकल्पनेतून सादर होत आहे. स्पर्धेची जिल्हास्तरीय अंतिम फेरी ७ जानेवारी २०१६ रोजी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे.
       चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड येथील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता यावे म्हणून स्पर्धेची पहिली निवड फेरी १३ डिसेंबर रोजी चिपळूण येथे लोकमान्य टिळक स्मारक हॉल येथे सकाळी ११ वाजता होईल. रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर येथील स्पर्धकांसाठी निवड फेरी रत्नागिरीत २५ डिसेंबर रोजी रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये होईल. या दोन्ही फेऱ्यांमधून १० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यसाठी स्पर्धकाला १ मराठी आणि १ हिंदी गाणे पाठ असणे अपेक्षित असून निवड फेरीच्या वेळी आपल्या आवडीचे कोणतेही गाणे स्पर्धक सादर करू शकतो. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील नामवंत कलाकारांची वाद्यवृंद साथ मिळाणार असून अंतिम फेरीसाठी स्पर्धकांकडून आवश्यक सराव करून घेतला जाणार आहे. गतवर्षीप्रमाणेच अंतिम फेरीच्या सोहळ्याला सेलिब्रेटींचीविशेष उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास  ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अभिजित गोडबोले (९९२२८६९०९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment