Saturday, 2 May 2015

होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` अभियान



`नवजीवन`चा उपक्रम :  स्पर्धा, निबंध, कथा व लेख स्पर्धेतून बौद्धिक खुराक


रायपाटण (ता. राजापूर) - उन्हाळी सुट्टीत होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` अभियान येथील नवजीवन विकास सेवा संस्था राबविणार आहे. वाचनातून स्पर्धा, निबंध, कथा आणि लेख स्पर्धेतून विद्यार्थ्यांना बौद्धिक खुराक देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
      परीक्षा संपल्यानंतर सुरू झालेल्या उन्हाळी सुटीत मुलांच्या ऊर्जेला वाट करून कशी द्यायची, असा प्रश्न शिक्षक आणि पालकांनाही पडतो. त्याचा एक प्रयत्न म्हणून रायपाटण येथील शिक्षण व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवजीवन विकास सेवा संस्थेने वसा वाचनाचा अभियान गेल्या वर्षी सुरू केले. यावर्षीही ते राबविण्यात येणार आहे. रायपाटण येथील जिजामाता विद्यालयातील एका विद्यार्थिनीने संस्थेच्या उपक्रमात भाग घेतल्यानंतर राज्यस्तरावरील तेरा हजार विद्यार्थ्यांमधून लेखन स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यातून या उपक्रमाचा प्रारंभ झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश पळसुले-देसाई यांनी दिली. वयम आणि साधना या दोन वाचनीय बालविशेषकांचे मोफत वितरण करून त्याआधारे विविध स्पर्धांचे आयोजन असे या "वसा वाचनाचा" उपक्रमाचे स्वरूप आहे. "वयम"मधील व आणि "साधना"मधील "स" या आद्याक्षरांचा वापर करून "वसा वाचनाचा" उपक्रम राबविण्यात येत आहे. तो चौथी ते बारावीच्या वयोगटातील कल्पक, चौकस, हुशार आणि होतकरू मुलांसाठी आहे. वक्तृत्व, कथाकथन, निबंध, अभिनय, वादविवाद अशा स्पर्धांसह विविध प्रकाचे सुयश मिळविसेस्आ किशोरवयीन मुलांना या उपक्रमात सहभाग राहील. अशा विद्यार्थ्यांची नावे पालकांनी, वर्गशिक्षकानी किंवा मुखाध्यापकांनी नवजीवन संस्थेला कळविल्यानंतर विद्यार्थ्यांना 'वयम' आणि 'साधना' अंक टपालाने मोफत पाठविला जाणार असून स्पर्धेचे स्वरूप कळविले जाईल. विजेत्यांना पुस्तके, सीडी, डीव्हीडी अशा स्वरूपात पारितोषिके दिली जाणार असून पारितोषिक वितरण समारंभ ऑगस्टमध्ये होईल. एखाद्या शाळेला, संस्थेला किंवा पालकांच्या गटाला वसा वाचनाचा उपक्रमात शिबिराचे आयोजन करायचे असेल तर तशी सशुल्क व्यवस्थाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष महेश पळसुलेदेसाई (९४००५५६८,   ९४२२७३, ९६८९७७६८२) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच nvssindia.com या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल. इच्छुकांनी navjeevan@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवजीवन विकास संस्थेच्या वसा वाचनाचा उपक्रमातील शिबिराचे संग्रहित छायाचित्र

No comments:

Post a Comment