रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी)
येथील जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा दुसरा वर्धापनदन येत्या शुक्रवारी (ता.
15) होणार आहे. ग्रामस्थांना एकत्रितरीत्या उपासना करता यावी, यासाठी बांधलेल्या या
मंदिराच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालवकरवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात
आले आहे.
कुरतडे गावातील महिला दर शुक्रवारी
संतोषीमातेची पूजा करत असत. गावातील सर्व महिलांना एकत्रित पूजा आणि व्रतवैकल्ये करता
यावीत, तसेच ग्रामस्थांनाही उपसना करता यावी, यासाठी कुरतडे गावाच्या पालवकरवाडीतील
ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन संतोषीमातेचे छोटेसे मंदिर बांधले.
दोन वर्षांपूर्वी या मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. तेव्हा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मंदिराचा
जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनीही पुढाकार घेऊन निधी
संकलित केला. कुरतडे दशक्रोशीत संतोषीमातेचे मंदिर नसल्याने या मंदिराचा भक्तांना लाभ
झाला. मंदिरात दैनंदिन पूजाआरती केली जाते. जीर्णोद्धारानंतर गेली दोन वर्षे वर्धापनदिन
साजरा केला जातो. गावातून संतोषीमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जोगवा मागितला जातो.
त्यामधून उत्सवाचा खर्च केला जातो. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ, विशेष कामगिरी बजावलेले
ग्रामस्थ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
यावर्षीचा वर्धापनदिन येत्या शुक्रवारी
(ता. 15) होणार आहे. सकाळी आठ वाजता विधिवत पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. सत्यनारायणाच्या
पूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती-महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी
पालखी मिरवणूक, भजन, रात्री आठ वाजत मान्यवरांचा सत्कार केला जाईल. रात्री साडेदहा
वाजता लांजा येथील मांडवकरवाडीतील बहुरंगी नमन सादर केले जाईल. विलास पालवकर, महेश
पालवकर, विजय पालवकर, रामचंद्र पालवकर, गोपाळ पालवकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या
या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक नारायण पालवकर यांनी केले आहे.
प्रेषक – नारायण पालवकर,
कुरतडे, ता. रत्नागिरी फोन – 9403614782
No comments:
Post a Comment