नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय
कीर्तनकार
चारुदत्तबुवा
आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट ही उपाधी, मानपत्र देताना
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज.
|
नाशिक : राष्ट्रीय
कीर्तनकार हभप चारुदत्त
आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट अशी उपाधी बहाल केली. आफळेबुवांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजजागरणाबद्दल त्यांचा हा सत्कार
करण्यात आला. रामानंदाचार्यांच्या दक्षिणपीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज
यांच्या हस्ते शाल-श्रीफळ,
सन्मानपत्र,
स्मृतिचिन्ह देऊन आफळेबुवांना गौरवण्यात आले.
येथील
साधूग्राममधील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नगरात हा सोहळा झाला. कीर्तनकार
चारुदत्त
आफळे यांची नगरात रोज वेगवेगळ्या विषयांवर कीर्तने होत आहेत. त्यांचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रपुरुषांच्या
चरित्रांचा व्यासंग दांडगा आहे. आपल्या रसाळ वाणीतील कीर्तनाने ते श्रोत्यांना
मंत्रमुग्ध करतात. आजपर्यंतच्या त्यांच्या या कार्याची दखल नरेंद्राचार्यजी महाराज
यांनी घेऊन त्यांना ही उपाधी दिली.
यावेळी
जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे पुरोहित वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी, कौस्तुभ
शौचे गुरुजी, स्वामीजींचे
भक्त-भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आफळेबुवा म्हणाले, माझ्या कामाची दखल
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी घेतली. मी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. महाराजांचे qहदुत्वाचे काम सर्वोच्च आहे. स्पष्ट
बोलण्याची हिंमत स्वामीजींच्याकडे आहे. त्यांचे घरवापसीचे काम फार मोठे आहे. मी
कीर्तनाच्या माध्यमातून क्रांतीकारी संत,
देशभक्त,
क्रांतिकारक यांची चरित्रे सांगतो. त्याद्वारे राष्ट्रप्रेम
जागवण्याचे काम मी आजपर्यंत केलेले आहे. त्यामुळेच स्वामीजींनी केलेल्या गौरवाने
मी कृतकृत्य झालो आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे.
No comments:
Post a Comment