रत्नागिरी – रत्नागिरी मल्याळी सेवा संघाने आयोजित केलेल्या ओणम महोत्सवात
दरवर्षीप्रमाणेच फुलांची रांगोळी म्हणजेच पुक्कलम हे यावर्षीचेही मुख्य आकर्षण
होते.
टायरवाले अशीच केरळी लोकांची प्रतिमा असते. त्याबरोबरच
बेकरी व्यवसायातही केरळी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या पंधरा वर्षांमध्ये आणि
प्रामुख्याने कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर केरळमधील लोकांचे रत्नागिरीत स्थायिक
होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या उद्योगांसह विविध नोकरी-व्यवसायांमध्येही
केरळचे हे लोक स्थिरावले आहेत. अशा केरळी बांधवांनी रत्नागिरी मल्याळी सेवा संघ
स्थापन केला आहे. दरवर्षी संघामार्फत विविध कार्यक्रम केले जातात. नारळी
पौर्णिमेला साजरा होणारा ओणम हा केरळमधील मोठा उत्सव असतो. रत्नागिरीच्या केरळी
बांधवांतर्फे गेली काही वर्षे ओणमच्या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो. यावर्षीचा
महोत्सव श्रावण अमावास्येला झाला. रत्नागिरीतील केरळी बांधव त्यावेळी उपस्थित
होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि वेळेत साजरे झालेले नृत्यगायनादी सांस्कृतिक
कार्यक्रम तसेच फुलांच्या रांगोळी प्रदर्शन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते.
यावर्षीच्या स्पर्धेत छोट्या आणि खुल्या गटात एकूण 13 जणांनी सहभाग घेतला. फुले,
पाकळ्या आणि फुलांच्या अन्य भागांपासून तयार केलेल्या या सर्वच रांगोळ्या उत्तम
होत्या. त्यातून क्रमांक काढणे किती कठीण झाले असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
......
No comments:
Post a Comment