Tuesday 7 April 2015

सुलोचना करंबेळकर यांचे निधन
मठ (ता. लांजा) येथील श्रीमती सुलोचना बाळकृष्ण करंबेळकर (वय ) यांचे रविवारी (ता. 5) रात्री राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.


लांजा तालुक्यात करंबेळकर गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेले (कै.) बा. के. करंबेळकर यांच्या त्या पत्नी होत. नऊ वर्षांपूर्वी गुरुजींचे निधन झाले. तत्पूर्वी सहा महिने (कै.) सुलोचना करंबेळकर यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यात कमीअधिक सुधारणा होत होती. गेले वर्षभर मात्र त्या आजारीच होत्या. गँगरीन झाल्याने महिनाभरापूर्वी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत केली. अखेर रविवारी (ता. 5) रात्री 11 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सोमवारी (ता. 6) मठ येथील कुंभारवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकूळ (ता. कणकवली) येथील त्यांचे नातलग, आप्तस्वकीय, परिचित आणि स्नेहसंबधित उपस्थित होते.


त्यांच्या पश्चात शिक्षकी पेशातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले पुत्र आनंद, दोन विवाहित कन्या, सून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment