Sunday, 20 September 2015

आईचं मुलाला (सोशल मीडियावर) पत्र.... (adz91 च्या सौजन्याने)

पाठ्यपुस्तकातील `दिनूचे बिलधड्याची आठवण करून देणारी घटना

मराठी पाठ्यपुस्तकामधील `दिनूचे बिलनावाचा धडा अनेकांनी वाचला असेल. या धड्याची आठवण करून देणाऱ्या एका पत्राची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. हे पत्र आईने मुलाला लिहिले आहे. वाचा हे पत्र.
.............


स्वातंत्र्याचा धडा

     मी आता कमवायला लागलोय आणि स्वतंत्र आहे असं सांगणा-या १३ वर्षांच्या मुलाला युरोपमधल्या वैतागलेल्या आईने स्वातंत्र्याचा धडा नावाचं एक पत्र लिहिलं आणि आपल्या भावनांना मोकळं व्हायला वाव दिला. फेसबुकवरल्या त्या पत्राला लाखाच्या घरात समदु:खी मातांनी व नेटिझन्सनी शेअर केलं असून ही समस्या घराघरात कशी शिरलीय याची चुणूक दाखवली आहे.
      इस्टेला हाविशम असं सिंगल पेरेंट असलेल्या या महिलेचं नाव असून अरॉन असं तिच्या मुलाचं नाव आहे. अरॉन आईला एक रुममेटसारखी वागणूक देतो आणि तिचे नियम पाळण्यास नकार देताना मी यू ट्यूबवर पैसे कमवू शकतो. मी स्वतंत्र आहे आणि गृहपाठअभ्यास वगैरे गोष्टींची अपेक्षा बाळगू नको आदी सांगतो.
     वैतागलेल्या इस्टेला फेसबुकचा आधार घेतात आणि मुलाला उद्देशून पत्र लिहितात. तू स्वत:ला स्वतंत्र समजतोस नामग खोलीचं भाडंविजेचा खर्चइंटरनेटचा चार्ज आणि अन्नाची किंमत या गोष्टीदेखील दे असं त्या पत्रात लिहितात.
राहण्यापोटी ४३० डॉलर्सविजेच्या बिलापोटी ११६ डॉलर्सइंटरनेचसाठी २१ डॉलर्स आणि जेवणाचे १५० डॉलर्स एवढा खर्च येतो. वेळच्यावेळी साफसफाई कर अन्यथा त्यासाठी ३० डॉलर्स द्यावे लागतील, असंही ती पुढे म्हणते.
    मुलासाठी आपण काय काय विकतं घेतलं याची जंत्रीही त्यांनी दिली आहे.
    पत्राचा समारोप करताना एक रूममेट म्हणून न राहता तुला पुन्हा माझं मूल म्हणून राहायचं असेल तर वर दिलेल्या अटींचा आपण पुनर्विचार करू, असंही इस्टेला सुचवतात आणि मुलाच्या मनपरिवर्तनाची आशा बाळगतात.
    गेल्या आठवड्यात त्यांनी हे पत्र लिहिलं आणि ते अक्षरश: लाखांच्या संख्येनं शेअर झालंत्याची चर्चा झाली.
   आता ताज्या पोस्टमध्ये इस्टेला म्हणतातया पोस्टनंतर मुलाच्या वागणुकीत बदल झालाय आता मी त्याला काही सांगितलं तर तो ऐकतो...

..............
ही बातमी adz91 या मोबाइल अॅपवर प्रसिद्ध झाली आहे.
या आणि अशा बातम्या देणारे
तसेच जाहिरात पाहिल्याबद्दल पैसे मिळवून देणारे
adz91 हे अॅप आपणही अवश्य डाऊनलोड करून घ्या.
अधिक माहितीसाठी http://adz91ratnagiri.blogspot.in या ब्लॉगला अवश्य भेट द्या. या ब्लॉगवरील सुरुवातीच्या पोस्टमध्ये अॅपविषयी तसेच डाऊनलोड करण्यासंबंधीची माहिती आहे.



Friday, 18 September 2015

चारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट उपाधी बहाल

नाशिक येथे  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कीर्तनकार
चारुदत्तबुवा आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट ही उपाधी, मानपत्र देताना
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज.
नाशिक : राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट अशी उपाधी बहाल केली. आफळेबुवांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजजागरणाबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला. रामानंदाचार्यांच्या दक्षिणपीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन आफळेबुवांना गौरवण्यात आले.
येथील साधूग्राममधील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नगरात हा सोहळा झाला. कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची नगरात रोज वेगवेगळ्या विषयांवर कीर्तने होत आहेत. त्यांचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा व्यासंग दांडगा आहे. आपल्या रसाळ वाणीतील कीर्तनाने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. आजपर्यंतच्या त्यांच्या या कार्याची दखल नरेंद्राचार्यजी महाराज यांनी घेऊन त्यांना ही उपाधी दिली.
यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे पुरोहित वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी, कौस्तुभ शौचे गुरुजी, स्वामीजींचे भक्त-भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      सत्काराला उत्तर देताना आफळेबुवा म्हणाले, माझ्या कामाची दखल जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी घेतली. मी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. महाराजांचे qहदुत्वाचे काम सर्वोच्च आहे. स्पष्ट बोलण्याची हिंमत स्वामीजींच्याकडे आहे. त्यांचे घरवापसीचे काम फार मोठे आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून क्रांतीकारी संत, देशभक्त, क्रांतिकारक यांची चरित्रे सांगतो. त्याद्वारे राष्ट्रप्रेम जागवण्याचे काम मी आजपर्यंत केलेले आहे. त्यामुळेच स्वामीजींनी केलेल्या गौरवाने मी कृतकृत्य झालो आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे.

Thursday, 17 September 2015

कॅमेरा आणि मेमरी कार्ड मिळवा 60 टक्के सवलतीत

सोबतच्या लिंकचा वापर करून ऑनलाइन खरेदी केल्यास

कॅमेरा तसेच मेमरी कार्ड आणि डिजिटल कॅमेराशी संबंधित अॅक्सेसरीज ६० टक्क्यांपर्यंत सवलतीत मिळू शकतील.

अवश्य भेट द्या.

http://www.snapdeal.com/products/cameras?utm_source=aff_prog&utm_campaign=afts&offer_id=17&aff_id=37250

Tuesday, 15 September 2015

रत्नागिरी मल्याळी सेवा संघाची पुक्कलम

रत्नागिरी – रत्नागिरी मल्याळी सेवा संघाने आयोजित केलेल्या ओणम महोत्सवात दरवर्षीप्रमाणेच फुलांची रांगोळी म्हणजेच पुक्कलम हे यावर्षीचेही मुख्य आकर्षण होते.
      टायरवाले अशीच केरळी लोकांची प्रतिमा असते. त्याबरोबरच बेकरी व्यवसायातही केरळी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या पंधरा वर्षांमध्ये आणि प्रामुख्याने कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर केरळमधील लोकांचे रत्नागिरीत स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या उद्योगांसह विविध नोकरी-व्यवसायांमध्येही केरळचे हे लोक स्थिरावले आहेत. अशा केरळी बांधवांनी रत्नागिरी मल्याळी सेवा संघ स्थापन केला आहे. दरवर्षी संघामार्फत विविध कार्यक्रम केले जातात. नारळी पौर्णिमेला साजरा होणारा ओणम हा केरळमधील मोठा उत्सव असतो. रत्नागिरीच्या केरळी बांधवांतर्फे गेली काही वर्षे ओणमच्या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो. यावर्षीचा महोत्सव श्रावण अमावास्येला झाला. रत्नागिरीतील केरळी बांधव त्यावेळी उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि वेळेत साजरे झालेले नृत्यगायनादी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच फुलांच्या रांगोळी प्रदर्शन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. यावर्षीच्या स्पर्धेत छोट्या आणि खुल्या गटात एकूण 13 जणांनी सहभाग घेतला. फुले, पाकळ्या आणि फुलांच्या अन्य भागांपासून तयार केलेल्या या सर्वच रांगोळ्या उत्तम होत्या. त्यातून क्रमांक काढणे किती कठीण झाले असेल, याची कल्पनाच  केलेली बरी.
......


स्पर्धेत साकारण्यात आलेल्या पुष्परांगोळ्या















Monday, 14 September 2015

विनायक बापट पूजेसाठी पुरवितात 21 प्रकारची पत्री

पंधरा वर्षांचा उपक्रम – पर्यावरणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न


अगस्ती
रत्नागिरी – इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देतानाच येथील पर्यावरणप्रेमी विनायक बापट गणपतीच्या पूजेसाठी लागणारी 21 प्रकारची पत्री जमवून अनेकांना मागणीनुसार त्याचे वाटप करत आहेत. उत्सवापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील जंगलांमध्ये फिरून गोळा केलेली ही पाने ग्राहकांना पुरविण्याचा त्यांचा हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे.
गणेशोत्सव आता अगदी काही तासांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी लगबग सुरू झाली आहे. चित्रशाळांमधून गणेशमूर्ती घरोघरी जाऊन पोहोचत आहेत. वेळात वेळ काढून घरे सजविली गेली असून पूजासाहित्य, सजावट आणि आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू आहे. या साहित्यामध्ये पत्रीला म्हणजे विविध झाडांच्या पानांना खूपच महत्त्व आहे. मधुमालती, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेरी, रुई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती या 21 झाडांची पत्री गणपतीला वाहिली जाते. शहरात आणि ग्रामीण भागातही गणपतीचे पूजन करताना वाहिल्या जाणाऱ्या विविध वनौषधींची ही पाने अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे एक तर पत्री वाहिली जात नाही किंवा मिळतील तेवढ्याच झाडांची पाने वाहिली जातात.
अनेक झाडांची जोपासना करणारे रत्नागिरीचे पर्यावरणप्रेमी विनायक या साऱ्या वनौषधींची माहिती अनेकांना सांगत असत. त्यातूनच ही सारी पत्री जमवून देण्याची मागणी त्यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या एका परिचिताने केली. हाच धागा पकडून श्री. बापट यांनी विविध ठिकाणी फिरून पत्री जमवून ती अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्याचे ठरविले. सर्वच झाडांची त्यांना चांगलीच ओळख असल्याने ती झाडे मिळवून पत्री गोळा करण्यासाठी त्यांनी रत्नागिरी शहराच्या अनेक भागांसह पावस, कोळंबे, जयगड परिसरात भटकंती केली. जंगलांमधून ही झाडे शोधून काढली आणि पत्री जमविली. पहिल्या वर्षी दहा संच त्यांनी तयार केले. त्यापैकी केवळ चार संचांनाच मागणी आली. त्यानंतर मात्र हळूहळू दरवर्षी त्यांच्याकडे पत्रीची मागणी वाढू लागली. यावर्षी तर त्यांनी पाचशेहून अधिक संच तयार केले आहेत.
शमी
महिनाभर भटकंती करून पाने जमविणे, ती व्यवस्थित आणि ताजी राहण्यासाठी पाण्यात ठेवणे, वाया गेलेली पाने काढून टाकून त्यांची निगा राखणे, भाद्रपद महिना सुरू होताच एकवीस प्रकारच्या पत्रीचे संच तयार करणे अशी सर्व किचकट व्यवधाने श्री. बापट अत्यंत आनंदाने पार पाडतात आणि 40 रुपये एवढ्या अत्यंत अल्प मोबदल्यात ही पत्री मागणीनुसार उपलब्ध करून देतात. आरास आणि सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती पाहिल्या, तर श्री. बापट आकारत असलेली किंमत अत्यंत नगण्यच वाटते. पत्रीच्या पिशव्या भरून त्या वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी श्री. बापट यांना कुटुंबीयांबरोबरच मित्रमंडळी आणि कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथूनही त्यांचा एक स्नेही आवर्जून मुद्दाम उपस्थित राहतो. परस्परस्नेह वाढावा आणि पर्यावरणाबाबत जागृती व्हावी, लोकांनी निसर्ग समजून घ्यावा, दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे लोकांनी संरक्षण करावे, हाच आपला प्रयत्न असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
(विनायक बापट यांचा संपर्क क्र. – 9423048991)
..................
विविध 21 प्रकारची पत्री एकत्रित करून ती बांधण्याचे काम श्री. बापट यांच्या घरी सुरू आहे.


Thursday, 10 September 2015

मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत प्रथम

नवनिर्माण महाविद्यालय स्पर्धा : कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे प्रथम


दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करताना
शीला हेगशेट्ये
, सोबत प्राचार्य सुकुमार शिंदे, प्रा. टेकाळे.

रत्नागिरी – येथील नवनिर्माण महाविद्यालयात झालेल्या मृणाल हेगशेट्ये आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा) हिने, तर कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.

गेल्या ४ सप्टेंबर २०१५ रोजी नवनिर्माण महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. राज्यस्तरीय महाविद्यालयीन, तर जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. दोन्ही स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा), द्वितीय - श्रेयस सनगरे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय - पद्मश्री वालावडे (फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - विवेक चित्ते (एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके कॉलेज, नाशिक), श्रुती भिंगार्डे (एसीएस कॉलेज, लांजा). सांघिक चषक - एसीएस कॉलेज, लांजा.
कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - अश्विनी कांबळे (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), द्वितीय - कोमल रावराणे (वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय- शलाका वारेकर (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - तैबा रफिक बोरकर (अभ्यंकर कुलकर्णी ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), गौरी रहाटे (साडवली, ज्यु. कॉलेज), सांघिक चषक – नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी.
विजेत्यांना रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य सुकुमार शिंदे, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. रत्नागिरीसह सातारा, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्पर्धकांचा त्यात समावेश होता.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविधांगी वाचन करून आपल्या ज्ञानात वाढ केली पाहिजे. वक्तृत्व कलाही महत्त्वाची आहे. वाचन करून त्यावर चिंतनातून आपली मते तयार केली, तर वक्तृत्वाला झळाळी प्राप्त होते.
माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये म्हणाले, समाजातील चुकीच्या गोष्टींवर वक्त्यांनी बोलून समाजाचे प्रबोधन करावे. अभ्यासाला महत्त्व देऊन विधायक गोष्टींच्या निर्मितीसाठी विद्यार्थीदशेतूनच सक्रिय व्हावे.
स्पर्धेसाठी प्रमोद कोनकर, प्रा. नामदेव कुंभार, सौ. स्नेहा साखळकर, डॉ. आशा जगदाळे, प्रा. राजशेखर दवणे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन टेकाळे यांनी आभार मानले.
.............
मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, प्राचार्या सुकुमार शिंदे, संचालिका सीमा हेगशेट्ये, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये, परीक्षक प्रमोद कोनकर, राजशेखर दवणे,  प्रा. आशा जगदाळे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई आदी.
................................


Monday, 7 September 2015

`झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन

कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे पुस्तकाची निर्मिती


  मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी लिहिलेल्या `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे नुकतेच औरंगाबाद येथे प्रकाशन झाले.  पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध उपायांची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन दिवसांची जलविषयक परिषद औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी डॉ. चितळे यांचे अभीष्टचिंतनही करण्यात आले. या समारंभातच `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे प्रकाशन जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
       `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाची अक्षरजुळणी,  संकलन आणि संपादन रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस या संस्थेने केले आहे. पुण्यातील बुकगंगा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पुस्तक वितरण संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक उपलब्ध होऊ शकेल. रत्नागिरीत कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस (9822255621) तसेच मॅजेस्टिक बुक हाऊस (पुढारी भवन, माळ नाका, रत्नागिरी) येथेही पुस्तक उपलब्ध होईल.
औरंगाबाद येथे `झेलू पाऊस ओंजळीत`चे प्रकाशन
----------------------------------------------


प्रकाशन समारंभानंतर जलवर्धिनी संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या जलसाठवण
टाकीची पाहणी डॉ. चितळे यांनी केली. त्यांना माहिती देताना उल्हास परांजपे
......................................................................

`झेलू पाऊस ओंजळीत`ची झलक