कुडाळ : ‘स्वरसिंधुरत्न’तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील कलाकारांची सूची
तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता गायन आणि वादन क्षेत्रातील सर्व कलाकारांनी
आपली माहिती येत्या ३० जूनपर्यंत
पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देताना कलाकाराचे
संपूर्ण नाव, कलाप्रकार, तालुका, जन्मतारीख, पूर्ण पत्ता,
तालुक्यापासूनचे गावाचे अंतर, फोन आणि व्हॉट्सअॅप मोबाइल नंबर, घरचा फोन नंबर, ई-मेल आयडी, सध्या राहत असलेले ठिकाण, गुरूचे नाव, संगीत क्षेत्रातील घराणे, संगीत शिक्षण किती वर्षे
घेतले, वादक कलाकारांनी आतापर्यंत कोणकोणत्या प्रसिद्ध गायकांना
साथ केली, मिळालेल्या
पुरस्कारांची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे, विशेष कार्यक्रमाचे
स्थळ, कोणत्या संस्थेतर्फे विशेष कार्यक्रम केले इत्यादी तपशील पाठवावा. मूळचे सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा इतरत्र राहणाऱ्या
कलाकारांनीही ही माहिती पाठवावी.
याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज सोबत दिला आहे. त्याची प्रिंट काढून घेऊन संपूर्णपणे भरलेला
अर्ज खालील ठिकाणी पाठवावा –
श्री. प्रशांत प्रभाकर
धोंड,
२२७५, प्रभाकर, मु. पो. शंकरवाडी (नवीवाडी),
पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६५२८
ईमेल - dhondprashantp11@gmail.com
श्री. धोंड यांच्याशी (०२३६२)
२२२१६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९४२३३०९४३२ या मोबाइलवर संपर्क साधावा.
...............
छान उपक्रम
ReplyDeleteसर्वांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.भविष्य घडावा
ReplyDelete