गणेशोत्सवासाठी ‘पावला गणराजा’ अल्बमचे
मुंबईत प्रकाशन
मुंबई : गायक कलाकारांप्रमाणेच त्यांना
साथ देणाऱ्या पडद्यामागच्या असंख्य कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी
रत्नागिरीच्या विधाता म्युझिकने संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू केलेली चळवळ
गौरवास्पद आहे. गौरांग आगाशे याने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला सर्वांनीच
साथ दिली पाहिजे, असे उद्गार ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, अशोक पत्की यांनी काल (ता. १९) मुंबईत काढले.
मुंबई – रत्नागिरीतील
विधाता म्युझिक संस्थेच्या ‘पावला
गणराजा’ ध्वनिफितीचे प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रकाशन करताना आमदार उदय सामंत, शंकर अभ्यंकर, अशोक पत्की, गौरांग आगाशे, अभिजित भट |
गायकाचे गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी
झटणाऱ्या पडद्यामागच्या संगीत कलाकारांचा परिचय करून देणाऱ्या विधाताम्युझिकआरटीएन
(www.vidhatamusicrtn.com) या संकेतस्थळाचे
उद्घाटन श्री. पत्की यांच्या हस्ते काल मुंबईत प्रभादेवीतील रवींद्र नाट्यगृहात
झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सतारवादक शंकर अभ्यंकर आणि रत्नागिरीचे आमदार
उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. पत्की म्हणाले की, मी नेहमी
भाषणातून सांगत आलो आहे की सर्व कलाकारांचा विचार झाला पाहिजे. पडद्यामागील कलाकारांना
व्यासपीठ मिळायलाच हवे. रत्नागिरीच्या गौरांग आगाशे त्यासाठी प्रयत्न करत आहे,
याचे मला कौतुक वाटते. त्याला या क्षेत्रातील सर्वांनीच मदत करायला हवी. श्री.
अभ्यंकर यांनीही या कार्याला शुभेच्छा दिल्या. आमदार उदय सामंत म्हणाले की,
रत्नागिरीच्या कलाकारांनी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरासारख्या नाट्यगृहात
कार्यक्रम करणे हेच मोठे धाडसाचे आहे. यापुढे या उपक्रमासाठी आवश्यक असेल, ती सर्व
मदत मी देणार आहे.
उद्घाटन
समारंभाला रत्नागिरी आणि मुंबईतील संगीतप्रेमींनी गर्दी केली होती. संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन होताच अनेकांनी
संकेतस्थळाला भेट दिली.
......................................................................................................................................
No comments:
Post a Comment