रागसमय चक्रावर आधारित बारा तासांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
रत्नागिरी - ‘निशिगंध ते प्राजक्त’ हा संपूर्णपणे
शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करून सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या
शिष्यांनी रत्नागिरी शहराची सांस्कृतिक उंची वाढविली आहे, असे गौरवोद्गार
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी काढले.
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सौ. मुग्धा भट-सामंत यांचे
वडील गजानन भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. सामंत यांनी आणि त्यांच्या शिष्य
परिवाराने ‘निशिगंध ते प्राजक्त’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई
शेट्ये सभागृहात तब्बल बारा तास चाललेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित या
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. पाटणे बोलत होते. शास्त्रीय संगीत हा भारताचा ठेवा असून पॉप संगीताच्या
आजच्या काळातही त्याला जगभरात मानाचे स्थान आहे, असेही ते म्हणाले. महाविद्यालयाचे
प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश कांबळे यांनीही कार्यक्रमाचे कौतुक करून संगीताच्या
विद्यार्थ्यांनी नियमित रियाज करून यश मिळवावे, असे आवाहन केले. ॲड. पाटणे, डॉ. कांबळे
यांच्यासह ध्वनिसंयोजक राजू बर्वे आणि छायाचित्रकार दिलीप केळकर यांचा यावेळी
विशेष सत्कार करण्यात आला.
-
कार्यक्रमात गीते सादर करताना विद्यार्थी
|
शास्त्रीय संगीत कसे
मनोरंजक असू शकते हे समजावे, त्याची गोडी मुलांना लागावी, यासाठी कार्यक्रम आयोजित
केल्याचे सौ. मुग्धा भट-सामंत यांनी सांगितले. गायनापेक्षाही संगीताची माहिती आणि
अभ्यास त्यांनी करावा, हाच त्यातील हेतू आहे. तरुण पिढीने पारंपरिक शास्त्रीय
संगीताचा प्रचार आणि प्रसार करावा, म्हणून असेच माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण
कार्यक्रम करत राहण्याचा आपला संकल्प असल्याचे त्या म्हणाल्या.
‘निशिगंध ते प्राजक्त’ हा संपूर्ण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम शनिवारी
(ता. १६) सायंकाळी ६ ते रविवारी (ता. १७) सकाळी ६ या वेळेत सादर करण्यात आला.
रागसमय चक्रावर आधारित या कार्यक्रमात ६ ते ६० वयोगटातील शिष्य सहभागी झाले.
निशिगंध सायंकाळी हळुवार उमलत जातो आणि प्राजक्ताचा सडा सकाळी पडतो. तेच औचित्य
साधून सायंकालीन रागांपासून प्रातःकाळापर्यंत वेगवेगळ्या प्रहरात नेमून दिलेले राग
या कार्यक्रमात सादर झाले. त्या त्या वेळात राग गायला गेल्यानंतर साधलेल्या परिणामांचा
अभ्यास सौ. सामंत यांच्या प्रारंभिक ते अलंकारपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केला. तोच
यावेळी सादर करण्यात आला. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत गायले जाणारे व विशेष न
गायले जाणारे राग या कार्यक्रमात सादर झाले. कार्यक्रमात सूत्रसंचालन-निवेदनाची बाजू
विद्यार्थ्यांनीच सांभाळली. सर्व रागांचे विद्यार्थ्यानी अभ्यासपूर्ण निवेदन केले.
रागाच्या रसनिष्पत्तीमध्ये समयाचा मोठा वाटा असतो. त्या त्या समयी तो तो राग सादर
झाला तर अधिक परिणाम साधू शकतो का याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. राग,
रस, स्वर, रंगय, समय या सगळ्यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी
केला. खमाज, काफी, भूप, दुर्गा, बागेश्री, विहाग, देस, जोग, नंद, हंसध्वनी,
जयजयवंती, शंकरा, मियामल्हार, मालकंस, दरबारी कानडा, नायकी कानडा, चंद्रकंस,
मधुकंस, बसंत, बहार, ललत, बिभास, अहिरभैरव, नटभैरव, भैरवी हे राग या कार्यक्रमात
सादर केले गेले. रागांच्या वादी आणि संवादी स्वरांच्या रंगांचे पोषाख गायकांनी
परिधान केले होते. कार्यक्रमाला प्रसाद वैद्य, राजू धाक्रस, केदार लिंगायत, निखिल
रानडे (तबला), तर संतोष आठवले, वैभव फणसळकर, चैतन्य पटवर्धन, मधुसूदन लेले
(हार्मोनिअम) यांनी संगीतसाथ केली.
राग आणि समय या
विषयासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रश्नावली तयार करून या कार्यक्रमात संगीत
शिकणाऱ्या आणि न शिकलेल्या रसिकांकडून भरून घेण्यात आली.
.................................
-
‘निशिगंध ते प्राजक्त’मधील गायक कलाकार आणि शिक्षकांसह सौ. मुग्धा भट-सामंत.
|
Excellent idea and execution! Great effort in popularizing Indian classical music in a novel way!
ReplyDeleteBravo Mugdha and fellow students....it is i guess the only programme organised like this in India...Proud of u...
ReplyDeleteBravo Mugdha and fellow students....it is i guess the only programme organised like this in India...Proud of u...
ReplyDeleteKya baat hai.....mugdha ani sarv shishyache hardik abhinandan ani khup khup shubhechch
ReplyDeleteKya baat hai.....mugdha ani sarv shishyache hardik abhinandan ani khup khup shubhechch
ReplyDeleteProud of you Mugdha...
ReplyDeleteMany congratulations....keep it up !!
मुग्धा, शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत पोचवण्याचा वाखाणण्याजोगा उपक्रम. असेच उत्तमोत्तम कार्यक्रम तुझ्याकडून घडत राहोत हीच सदिच्छा (आणि अपेक्षा)
ReplyDeleteमुग्धा, शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत पोचवण्याचा वाखाणण्याजोगा उपक्रम. असेच उत्तमोत्तम कार्यक्रम तुझ्याकडून घडत राहोत हीच सदिच्छा (आणि अपेक्षा)
ReplyDeleteअत्यंत स्तुत्य उपक्रम.मनापासून शुभेच्छा.
ReplyDeleteअत्यंत स्तुत्य उपक्रम.मनापासून शुभेच्छा.
ReplyDelete