रत्नागिरी : कोकण मराठी
साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे नलिनीताई आजगावकर स्मृती
जिल्हास्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी कोकणातील पाऊस
आणि पाणी या दोनपैकी एका विषयावर स्वरचित कविता पाठवायची आहे.
दरवर्षी कोमसापतर्फे
काव्यलेखन स्पर्धा घेण्यात येते. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळण्याकरिता
ही स्पर्धा नेहमी उपयुक्त ठरते. एखादा विषय दिल्यानंतर
कवींनाही प्रेरणा मिळते. स्पर्धेतील पहिल्या तीन
विजेत्यांना आणि दोन उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह
आणि प्रशस्तीपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. समारंभपूर्वक
बक्षीस वितरण केले जाईल.
कविता कागदाच्या एका बाजूला सुवाच्च
हस्ताक्षरात लिहिलेल्या असाव्यात. एका कागदावर कवी-कवयित्रीचे
नाव, पत्ता, फोन नंबर, व्हॉट्सअप
नंबर, ई-मेल
आयडी सविस्तर लिहावा. या कविता कोमसाप शाखाध्यक्ष चंद्रमोहन
देसाई, जी- १, प्रथमेश, छत्रपतीनगर, नाचणे, रत्नागिरी
– ४१५६३९ या पत्त्यावर ५ जुलै २०१६ पर्यंत
पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी श्री. देसाई (९७६४७९६६७६), खजिनदार
विद्याधर कांबळे (८०८७३५०१७१), शाखा उपाध्यक्ष अभिजित नांदगावकर
(९४२२३७५५५४) किंवा मकरंद पटवर्धन (९७६३५४८५५८) यांच्याशी
संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment