Wednesday, 15 June 2016

अभ्यंकर बालकमंदिरात मुलांचे स्वागत



      
रत्नागिरी : आनंदीबाई प. अभ्यंकर बालमंदिरामध्ये बालदोस्तांचे
औक्षण करताना मुख्याध्यापिका मीना रिसबूड.
रत्नागिरी : शहरातील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुरा
म अभ्यंकर बालकमंदिरामध्ये आज सकाळी मुलांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापाशी मुलांवर पुष्पवृष्टी करून प्रत्येक वर्गात मुलांचे औक्षण करण्यात आले. मुख्याध्यापिका मीना रिसबूड आणि सर्व शिक्षिकांनी मुलांना प्रार्थना शिकवली. शाळेच्या पहिल्याच दिवशी छोटा गट व मोठा गट सुरू झाला. खेळघर २० जूनपासून सुरू होणार आहे. नवीन दप्तरे घेऊन आलेल्या बालदोस्तांनी आजचा दिवस मजेत घालवला. काही मुले मात्र आईच्या आठवणीने रडत होती.

No comments:

Post a Comment