Wednesday 1 June 2016

रत्नागिरीत रविवारी कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स



रत्नागिरी : नव्याने स्थापन झालेल्या कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे येत्या रविवारी (ता. ५) रत्नागिरी पहिली कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
       उपजीविकेसाठी नोकरीचा पारंपरिक पर्याय न स्वीकारता व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी बिझिनेस फोरम स्थापन केला आहे. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे सतत वाढणारी स्पर्धा, वेळोवेळी बदलणाऱ्या कायद्यांचे फायदेतोटे, व्यवसायासाठी जागतिक स्तरावर खुली होणारी नवनवीन दालने यांची माहिती होण्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. फोरममार्फत पहिली बिझिनेस क़ॉन्फरन्स येत्या रविवारी (ता. ५ जून) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
       सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये उद्योगाचे अर्थ आणि नियोजन (ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी), केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे (मनोज कळके) आणि व्यवसायाच्या अभिनव कल्पना (पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई) यांची व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर चर्चासत्र आणि शंकासमाधान होईल.
       कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी प्रत्येकी २०० रुपये शुल्क असलेल्या दिवसभराच्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी किंवा प्रशांत पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...........................
संपर्क – १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९
२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९
३) रुची महाजनी – ९८८११५९३२०
४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४


1 comment:

  1. फारच उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रम.....
    त्या निमित्ताने उद्योजकांच्या गाठी-भेटी होतील, त्यात कदाचित् एकमेकांना पूरक उद्योजकांचा परिचय होईल; ज्यामुळे व्यवसाय ऊर्जितावस्थेकडे न्यायला मदत होईल.....
    अगणित शुभेच्छा.....
    - प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई, सावंतवाडी, जि. - सिंधुदुर्ग

    ReplyDelete