Tuesday, 5 July 2016

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन



रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१६ मध्ये घोषित होणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात आले आहेत. हे सर्व पुरस्कार कोमसापचे कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत.
प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समीक्षा, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांकरिता पुरस्कार दिले जातील. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.
विशेष सात पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यात वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कर, वि. कृ. नेरूरकर संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार आहेत.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अरुण नेरूरकर, ९९९, पार्वती सदन, मसुरेकरनगर, जेलरोड, रत्नागिरी यांच्याकडे पाठवाव्यात. त्यासाठी लागणारा अर्ज आणि माहितीपत्रकासाठी keshavsutsmarak@rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. पुस्तके १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत. पूर्वी पाठवलेली पुस्तके पुन्हा पाठवण्याची गरज नाही. मुदत असेपर्यंत वा मुदत संपेपर्यंत एकदा पाठवलेले पुस्तक पुरस्कारासाठी विचारात घेतले जाईल.


Friday, 17 June 2016

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे पाऊस-पाणी काव्यलेखन स्पर्धा

रत्नागिरी : कोकण राठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे नलिनीताई आजगावकर स्ृती जिल्हास्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी कोकणातील पाऊस आणि पाणी या दोनपैकी एका विषयावर स्वरचित कविता पाठवायची आहे.
दरवर्षी कोसापतर्फे काव्यलेखन स्पर्धा घेण्यात येते. नवोदित कवींना प्रोत्साहन िळण्याकरिता ही स्पर्धा नेही उपयुक्त ठरते. एखादा विषय दिल्यानंतर कवींनाही प्रेरणा िळते. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना आणि दोन उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिके, स्ृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. सारंभपूर्वक बक्षीस वितरण केले जाईल.

कविता कागदाच्या एका बाजूला सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेल्या असाव्यात. एका कागदावर कवी-कवयित्रीचे नाव, पत्ता, फोन नंबर, व्हॉट्सअप नंबर,  ई-ेल आयडी सविस्तर लिहावा. या कविता कोसाप शाखाध्यक्ष चंद्रोहन देसाई, जी- १, प्रथेश, छत्रपतीनगर, नाचणे, रत्नागिरी – ४१५६३९ या पत्त्यावर       ५ जुलै २०१६ पर्यंत पाठवाव्यात. अधिक ाहितीसाठी श्री. देसाई (९७६४७९६६७६), खजिनदार विद्याधर कांबळे (८०८७३५०१७१), शाखा उपाध्यक्ष अभिजित नांदगावकर (९४२२३७५५५४) किंवा करंद पटवर्धन (९७६३५४८५५८) यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, 15 June 2016

अभ्यंकर बालकमंदिरात मुलांचे स्वागत



      
रत्नागिरी : आनंदीबाई प. अभ्यंकर बालंदिराध्ये बालदोस्तांचे
औक्षण करताना ुख्याध्यापिका ीना रिसबूड.
रत्नागिरी : शहरातील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुरा
अभ्यंकर बालकंदिराध्ये आज सकाळी ुलांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापाशी ुलांवर पुष्पवृष्टी करून प्रत्येक वर्गात ुलांचे औक्षण करण्यात आले. ुख्याध्यापिका ीना रिसबूड आणि सर्व शिक्षिकांनी ुलांना प्रार्थना शिकवली. शाळेच्या पहिल्याच दिवशी छोटा गट व ोठा गट सुरू झाला. खेळघर २० जूनपासून सुरू होणार आहे. नवीन दप्तरे घेऊन आलेल्या बालदोस्तांनी आजचा दिवस जेत घालवला. काही ुले ात्र आईच्या आठवणीने रडत होती.