रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने झाशीच्या
राणीला १५९ व्या पुण्यतिथीला ग्रंथरूप आदरांजली वाहिली. ‘क्रांतिज्वाला’ नामक या
गीतसंग्रहाचे प्रकाशन करतानाच या संग्रहातील सर्व गीते सादर करून दुहेरी औचित्य
साधले.
‘क्रांतिज्वाला’च्या प्रकाशन समारंभात बोलताना अॅड. विलास
कुवळेकर.
व्यासपीठावर उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, माधव हिर्लेकर, नगराध्यक्ष राहुल पंडित,
डॉ. श्रीकृष्ण
जोशी, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे
|
या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव
हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, डॉ. जोशी, नगराध्यक्ष राहुल
पंडित, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या भाषणात
राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा लवकरच उभारू,
अशी ग्वाही दिली. लक्ष्मी
चौक या नावाने चौक असला तरी साळवी स्टॉप परिसरामध्ये पुतळा झाला पाहिजे. यातून
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराची आठवण व राणी लांज्यातील असल्याने तिच्या शौर्याचे
स्मरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. जोशी यांनी मनोगतामध्ये सांगितले, लहानपणी माझे
वडील (कै.) सखाराम व आई (कै.) शकुंतला यांनी मला लक्ष्मीबाईंच्या कोट येथील गावी
नेले होते. तेव्हा जाणीवपूर्वक दोघांनी लक्ष्मीबाईंची कथा सांगितली. तू राणीवर
कविता लिही, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आई-वडिलांची इच्छा व
माझे स्वप्न पूर्ण होण्याचा योग इतक्या वर्षांनी आला. लक्ष्मीबाईंचे आयुष्य धगधगते
होते. तिच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचे स्मरण, वाचन पुढच्या
पिढीने केले पाहिजे, याकरिता हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक
विक्रीतील सर्व फायदा कर्हाडे ब्राह्मण संघाला देणार असल्याचेही त्यांनी जाहीर
केले.
श्री. हिर्लेकर यांनी स्वागत केले. सौ.
प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. पराग आंबेकर यांनी आभार मानले.
उत्तरोत्तर रंगत
गेलेली मैफल
|
मैफलीत रंगून
गेलेले श्रोते
|