संतोषीमाता |
रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील पालवकरवाडीतील
संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला आहे.
कुरतडे येथील पालवकरवाडीतील निसर्गरम्य परिसरात एकतीस
वर्षांपूर्वी संतोषीमाता मंदिराची स्थापना करण्यात आली. परिसरातील ग्रामस्थांनी
वर्गणी काढून मंदिराची उभारणी आणि सुशोभीकरण केले. त्यामध्ये चाकरमान्यांचा मोठा
हातभार लागला. मंदिर स्थापन झाल्यापासून दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात
साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गरबा नृत्यही आयोजित केले जाते. यावर्षीही नवरात्रोत्सव
थाटात सुरू झाला आहे. पारंपरिक पद्धतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये
दररोज देवीची आरती केली जाते. त्यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग असतो. लहा मुले तसेच
पुरुष आणि महिलांसाठीही दररोज फनीगेम्स घेतले जातात. तरुणांच्या आकर्षणाचा बिंदू
असलेल्या गरबानृत्याचा कार्यक्रम दररोज रात्री आयोजित केला जातो. कोकणाची ओळख
असलेल्या जाकडी नृत्याचे कार्यक्रमही केले जात असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत आहे.
नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जय
संतोषीमाता नृत्य नाच नमन मंडळातर्फे नारायण पालवकर आणि गोपाळ पालवकर यांनी केले आहे.
........
कुरतडे (ता. रत्नागिरी) पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिर. |
-
...................
No comments:
Post a Comment