वीरश्री ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत नव्यानेच स्थापन झालेल्या सायकल क्लबतर्फे रत्नागिरी शहर ते हातखंबा आणि परत अशा वीस किलोमीटरच्या पहिल्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष श्री. पंडित यांनी रत्नागिरी ते हातखंबा आणि परत ही संपूर्ण फेरी पूर्ण केली. त्यानंत समारोप प्रसंगी ते बोलत होते.
तत्पूर्वी फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता झाले. शिवाजीनगर आठवडा बाजाराजवळ आयटीआयसमोर या फेरीचा प्रारंभ झाला. शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची भरपूर वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यांवरून सायकलस्वारांना जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ करावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्यांंनी त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काही वेळ स्वतः सायकलने या फेरीत सहभागी झाले. वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी सायकल क्लबचे अध्यक्ष, रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यावेळी म्हणाले की, रत्नागिरी सुंदर शहर आहे. ते तसेच राहावे, हे एक नागरिक म्हणून मनापासून वाटते, तर एक डॉक्टर म्हणून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये रत्नागिरीकरांचे आरोग्य उत्तम राहावे हीदेखील भावना आहे. त्यातूनच सायकल क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबचे उद्घाटन म्हणून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग ही सर्वांची सवय बनावी, हा आमचा प्रयत्न असेल.
फेरीच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभूते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या फेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. या वेळी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते धरमसी चौहान यांनी फेरीला झेंडा दाखवला.
फेरीसोबत रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था 10 ठिकाणी केली होती. येथे सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे चिरायू हॉस्पीटलशेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा सायकलपटूंना दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशीगंधा पोंक्षे, नितीन दाढे तसेच धन्वंतरी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, सामाजिक संस्थांनी या फेरीचे उत्तम नियोजन केले होते. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अॅधड. नानल गुरुकुल या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रॅक्विलिटी यांचे सहकार्य लाभले. सांगता कार्यक्रमात सहभागी मोठ्या व्यक्तींना मेडल्स देण्यात आली तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणार्या सायकल फेरीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. असे उपक्रम दोन महिन्यांतून एकदा तरी व्हावे, अशी अपेक्षा सार्यां्नी व्यक्त केली.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः वीस किलोमीटरची रॅली पूर्ण केली. हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरी प्रदूषणमुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी इंधन बचत करणारी व फिटनेस राखणारी सायकल सर्वांनी चालवावी व ‘सायकल डे’ साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
सुदृढ आरोग्य, सुंदर शहर आणि वाढते इंधन दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्याकरिता क्लब स्थापन झाला. आजच्या रॅलीनंतर सभासद संख्या वाढू लागली आहे. दररोज सायकलिंग आणि दर रविवारी सायकल भ्रमण मोहीम सुरू करण्याचा मानस या क्लबचा आहे.
.............
सायकल फेरीच्या समारोप समारंभात बोलताना रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित. सोबत डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षे, डॉ. नीलेश शिंदे, डॉ. सौ. तोरल शिंदे. |
..........
सायकल फेरीच्या आयोजनाविषयी डॉ. नीलेश शिंदे यांचे मनोगत
पाहा कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा –
............
No comments:
Post a Comment