मुग्धा भट-सामंत यांना रागार्पण कार्यक्रमासाठी बंधूंच्या शुभेच्छा
आजच्या आघाडीच्या शास्त्रीय गायिका ज्यांनी रत्नागिरीचे नाव आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने संपूर्ण महाराष्ट्रात केलेले आहे, त्या मुग्धा भट-सामंत यांचा माझा परिचय साधारण २-३ वर्षांपूर्वी बाळकृष्ण बुवांच्या नावे असलेल्या hike वरील ग्रुपच्या माध्यमातून झाला. त्यापूर्वी त्यांचे मंडळात गाणेही झाले होते. मात्र ते ऐकायचा योग मला आला नव्हता. ग्रुपवर बरेच गायक आणि गायिका व इतर सदस्य असल्याने आणि ग्रुपवर केवळ सांगीतिक आदानप्रदान होत असल्याने त्यांचा-माझा वैयक्तिक संबंध अगर परिचय नव्हता.योगेशशी २००० मध्ये लग्न झाले. त्यानंतर २००१ मध्ये तिला मुलगा झाला. त्यामुळे तिचे गाणे जवळपास ५ वर्षे बंद होते. पण तिने ते पुन्हा हिमतीने चालू केले, इतकेच नाही तर त्याचा आपल्या भागात प्रचार आणि प्रसार सुरू केला. गाणे शिकवायला सुरवात केली. आज तिच्याकडे खूप मुले शिकतात.
मला मुग्धाकडे जाण्याचा आणि तिचा संसार आणि तिचे गुरुकुल बघण्याचा योग आला. अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटकी वास्तू, भारावून जावे असे स्वागत व आदरातिथ्य. मी गेलो त्यादिवशी ती खूप गडबडीत आणि व्यस्त होती. पण ती जिथे शिकवते तो हॉल आणि तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न. कुमार गंधर्वांपासून ती ज्यांना मानते, त्यांच्या तसबिरी अतिशय सुंदर पद्धतीने लावलेल्या, वातावरणात केवळ गाणे आणि गाणे, भारावूनच जावे. काही मुलांची शिकवणी चालू होती.
मला प्रत्यक्ष मुग्धाचे गाणे ऐकण्याचा योग्य अद्याप आलेला नाही. पण मी तिची जी रेकॉर्डिंग्ज ऐकली आहेत, ती निव्वळ अप्रतिम आहेत. ती खूप आर्ततेने गाते, तिचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचा लवकर योग यावा, असे वाटते.
मी पुन्हा एकदा तिला १६ जुलैच्या रागार्पण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
आपल्या आईवडिलांविषयी आपल्याला कृतज्ञता असते. मात्र आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १२-१२ तासाचे अनोख्या संकल्पनेचे कार्यक्रम करणारी मुग्धा एकटीच. मुग्धाविषयी मी अमर्याद लिहू आणि बोलू शकतो, पण आतापुरते थांबतो. मुग्धाला आपले सर्व यश योगेशच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आहे, याची जाणीव आहे. तिचा मुलगा ध्रुव खूप हुशार आणि थोडा खोडकर आहे (मामावर गेलाय!) ती आपल्या संसारात खूप सुखी आहे, याचा एक भाऊ म्हणून मला खूप आनंद आहे.
एके दिवशी राखी पौर्णिमेला त्यांचा अत्यंत आपुलकीचा एक मेसेज आला, त्याने मी हळवा झालो आणि त्यानंतर मुग्धा कधी माझी बहीण झाली कळलेच नाही. आमचे एक घट्ट अनुबंध निर्माण झाले आणि मी जसा मुग्धाच्या जवळ आलो आणि मला तिच्याविषयीची माहिती मिळाली, त्याने मात्र मी अवाक् झालो. एका चांगल्या, संस्कारित घरातील ही मुलगी केवळ तिच्या आई आणि आजीमुळे गाणे शिकली. आजची आघाडीची शास्त्रीय गायिका आणि एका गुरुकुलची संस्थापिका बनली. खरे तर तिला आर्मीमध्ये जायचे होते. पोलीस व्हायचे होते. मॉडेलिंग करायचे होते. ती शाळेत NCC मध्ये होती, ती वॉटर पोलो खेळत असे. स्विमिंगला तर ती नॅशनलपर्यंत गेली होती. तिने काही नाटकांतून कामे केलेली आहेत. नाटक करतानाच तिथे तिला तिच्या आयुष्याचा हिरो आणि जोडीदार योगेश मिळाला.
- ॲड. भैयासाहेब कुलकर्णी, इचलकरंजी
(9822299505)
No comments:
Post a Comment