रत्नागिरी : शहरातील गोविंवद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या
शतकमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध पाठवण्याची
अंतिम तारीख ३१ मार्च २०१६ आहे.
गेल्या शंभर वर्षांपासून रत्नागिरीत ही पाठशाळा संस्कृतची ज्ञानगंगा अखंड
प्रवाहित राहावी या हेतूने अध्यापन करत आहे. यंदा शतकमहोत्सवी वर्षात नानाविध
उपक्रमांचे आयोजन पाठशाळा करत आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयीन व मुक्त गटासाठी
जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, अशी माहिती संस्थेचे
अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी दिली.
स्पर्धा तीन गटांत होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी संस्कृतिः
संस्कृताश्रिता (संस्कृतभाषा आणि संस्कृती) हे विषय आहेत. शब्दमर्यादा ५०० आहे.
यातील विजेत्यांना ५००, ४०० व ३००
रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी आधुनिकयुगे
संस्कृतम् (आधुनिक काळात संस्कृत) हे विषय आहेत. शब्दमर्यादा ७५० आहे. यातील
विजेत्यांना ७००, ६०० व ५००
रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. मुक्त गटासाठी संस्कृतस्य महत्त्वम् (संस्कृतचे
महत्त्व) हे विषय आहेत. शब्दमर्यादा १००० असून विजेत्यांना ७००, ६०० व ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धकांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत निबंध पाठवावेत. निबंध पाठविण्याच पत्ता असा - श्रीकृष्ण पाध्ये, द्वारा रानडे संस्कृत पाठशाळा, वेदाचार्य फाटक गुरुजी चौक, सावरकर मार्ग, रत्नागिरी.
निबंधाच्या पहिल्या पानावर निबंधाचे नाव, लेखकाचे नाव, पूर्ण पत्ता, संपर्कक्रमांक लिहावा. निबंध मराठी किंकवा
संस्कृत भाषेतून लिहिता येईल. निबंध सुवाच्च अक्षरात लिहावा किंवा टंकलिखित करावा.
संस्कृत निबंधांचा विशेष विचार केला जाईल. १७ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता
पारितोषिक वितरण कार्यक्रमात निकाल जाहीर केला जाईल. अधिक माहितीसाठी संस्कृत
पाठशाळा ०२३५२-२२४१७० किंवा ९४४२२६३०४०३, ९४०३०५६५६३ या
क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment