Friday 11 December 2015

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार



रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे १२ ते १४ डिसेंबर २०१५ या कालावधीत रत्नागिरीत होणार असलेल्या पुलोत्सवातील तीन मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुलोत्सव सन्मान पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीला, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा पुलोत्सव रंगणार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत `गुण गाईन आवडी` या कार्यक्रमात पुरस्कार दिला जाईल. हाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर श्री. पुरंदरे प्रथच रत्नागिरीत येत आहेत. पुरंदरे यांनी शिवशाहीचा इतिहास संपूर्ण राठी नाला ज्ञात करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला. `जाणता राजा` हे हानाट्य केले आणि अनेक सामाजिक संस्थांच्या दतीसाठी त्याचे शेकडो प्रयोग झाले. याच हानाट्याच्या प्रयोगातून िळणाऱ्या निधीतून बाबासाहेबांनी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला असून, तोही पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे.
पुल आणि सुनीताबार्इंच्या दातृत्वाला सला करणारा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेणाऱ्या संस्थांचा गौरव सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने केला जातो. ही प्रथा रत्नागिरीच्या पुलोत्सवाने पाडली. यंदा हा पुरस्कार देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडी या संस्थेस देण्यात येणार आहे. राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडी ७ वर्षांपासून संकटात असणाऱ्या सर्वांना दत करीत आहे. या संस्थेकडे ३० प्रशिक्षित कार्यकर्ते असून १०० जणांचा चमू आहे. स्वतंत्र हिला विभागही आहे. सन्मानपत्र, स्ृतिचिन्ह, अकरा हजार रुपये आणि माली प्रतिष्ठानतर्फे १० हजार रुपये असे संस्थेला दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (ता. १३) रात्री ९ वाजता या पुरस्काराचे वितरण होईल.
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार पुष्कर श्रोत्री यांना दिला जाणार आहे. चतुरस्र अभिनयाने व विनोदाच्या आगळ्या शैलीने सर्व रसिकांना आनंद देणाऱ्या व निवेदनाच्या क्षेत्रातही आपल्या बहारदार वक्तृत्वाने जान आणणाऱ्या पुष्कर श्रोत्री यांचा गौरव करण्यात येणार आङे. स्ृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार पुलोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १४ डिसेंबरला वितरित केला जाईल. रात्री ९ वाजता `हसवासवी` नाट्यप्रयोगादरम्यान पुरस्कार वितरण होईल.

No comments:

Post a Comment