अॅड. विलास कुवळेकर – कोट येथे १८१ वी जयंती उत्साहात साजरी
कोट (ता. लांजा) : ``रणरागिणी झाशीच्या राणीचे स्मारक
उभारण्यासाठी लोकांनी सरकारकडे मागणी करूच नये. `गाव करील ते राव काय करील` या उक्तीनुसार ग्रामस्थांनीच त्यासाठी पुढाकार घ्यावा.
राणीने केलेल्या पराक्रमाच्या स्फूर्तीची ज्योत मनात निर्माण होणार असेल, तर चिरंतन
स्मारक निर्माण होईल``,
असे प्रतिपादन लांजा येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांनी येथे केले.
– समारंभात बोलताना अॅड. विलास कुवळेकर. |
राणी लक्ष्मीबाई हिची १८१ वी जयंती काल (ता. १९) कोट या राणीच्या मूळ गावी
समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी
व्यासपीठावर दिनकर नेवाळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सरपंच सौ. जयश्री भुवड,
माजी सरपंच शांताराम सुर्वे, कृष्णा आगरे, प्रकाश घडशी, जिल्हा परिषद सदस्य सौ.
स्वरूपा साळवी आदी उपस्थित होते. समारंभापूर्वी राणीच्या स्मारकाच्या नियोजित
स्थळी प्रतिमेचे पूजन आणि पोवाड्यांचे गायन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या
समारंभात श्री. कुवळेकर पुढे म्हणाले, ``भारतीय
स्वातंत्र्यासाठी लढणारी राणी लक्ष्मीबाई म्हणजे तांबे किंवा नेवाळकर घराण्यापुरती
मर्यादित नाही. सर्वांनाच तिच्या अनुवंशाचा वारसा आहे. अशा स्वातंत्र्यसेनानींच्या
बलिदानाला काळीमा फासण्याचे काम चालू आहे. अशा स्थितीत तिच्या पराक्रमापासून
प्रेरणा देण्यासाठी तिचे उचित स्मारक उभारले गेले पाहिजे. मात्र त्यासाठी शासनावर
अवलंबून राहून चालणार नाही. चांगला विचार करून प्रेरणादायी स्मारक उभारावे. आज
भारत स्वतंत्र झाल्याने आता ब्रिटिशांना हद्दपार करण्याची गरज राहिलेली नाही.
मात्र भ्रष्टाचारासारख्या दुर्गुणांना हद्दपार करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रेरणा
देणारे स्मारक उभारले पाहिजे.``
माजी सरपंच आबा सुर्वे म्हणाले की, मेरी झाँसी नही दूंगी म्हणणाऱ्या राणी
लक्ष्मीबाईच्या गावात आपण राहत असल्याने आपल्याला तिचा अभिमान वाटला पाहिजे. तिचा
इतिहास लहान मुलांसमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे.
प्रमोद कोनकर यांनी सांगितले की, राणीने ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून
स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटविली. तिचे स्मारक उभारण्यासाठी संघर्ष करण्याची
वेळ येऊ नये. तिचे जिवंत स्मारक उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी
ग्रामस्थांनीच आग्रह धरला पाहिजे.
श्री. रानडे, रामचंद्र डाफळे
आदींनीही यावेळी विचार व्यक्त केले. राजू नेवाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
-
कोट (ता. लांजा) - झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी
दीपप्रज्वलन
करून जयंती समारंभाचे उद्घाटन करताना अॅड. विलास
कुवळेकर. शेजारी अन्य मान्यवर.
|