Saturday, 28 November 2015

रत्नागिरीकरांनी उद्योगांना सहकार्य करायला हवे



उद्योजक दीपक गद्रे : वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण


 रत्नागिरी : ``घरच्या लोकांनी केलेल्या सन्मानाचे विशेष अप्रूप वाटते. आमच्या प्रकल्पात सांडपाणी नसून प्रक्रियेतून उरलेल्या घटकांतील पाणी असते. लोकांना मासे खायला आवडतात; पण माशांच्या प्रक्रिया उद्योगातील दुर्गंधी नको असते. त्यामुळे असे व्यवसायच येऊ नयेत, अशी नकारात्मक मानसिकता येथे अनुभवायला मिळाली. रोजगारनिर्मितीसाठी रत्नागिरीकरांनी उद्योगांना सहकार्य करायला हवे``, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गद्रे मरीन्सचे संस्थापक दीपक गद्रे यांनी व्यक्त केले. वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज वसुंधरा सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
रत्नागिरी : वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील
वसुंधरा सन्मान पुरस्कार गद्रे मरीन्सचे संस्थापक दीपक गद्रे
आणि सहकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
श्री. गद्रे म्हणाले, ``आम्हाला आमच्या उद्योगातून दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून अनेक प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान आणले. मासळीला मागणी भरपूर आहे. परिणामी मासेमारी वाढत असून माशांच्या पैदासीला संधी मिळत नाही. व्यापारी गरजा लक्षात घेऊन काम करायचे असेल, तर अद्ययावत तंत्रज्ञान लागते. सुरवातीला मत्स्यप्रक्रियेतून बाहेर पडलेल्या पाण्यावर तंत्रज्ञानाचा वापर केला तो अपयशी ठरला; मात्र त्यात हार न मानता जोमाने काम सुरू केले. कंपनीला क्लीन डेव्हलपमेंटचे पारितोषिक मिळाले असून, भारतातील आमची अशी एकमेव मत्स्यप्रक्रिया कंपनी आहे. सर्वांनी दिवस-रात्र मेहनत घेतल्याने यश मिळाले.``
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सांगता कार्यक्रमास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. ए. एस. कुलकर्णी, पेम संस्थेचे सतीश कामत आणि आंबा बागायतदार विजय देसाई उपस्थित होते.
डॉ. सुखटणकर यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. अनिल दांडेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. मंदार प्रभुदेसाई यांनी एलसीडी प्रोजेक्टरद्वारे गद्रे मरीन्स व प्रकल्पातील अद्ययावत यंत्रणा व शून्य कचरा व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत १२ खेळाडू आघाडीवर



रत्नागिरीत उद्घाटन : आंतरराष्ट्रीय मास्टर, महिला फिडेमास्टरचा समावेश


रत्नागिरी : चेसमन संस्था आयोजित भारताचे पहिले बुद्धिबळ चँपियन (कै.) आर. बी. सप्रे स्मृती फिडे जलद बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सप्रे यांच्या ९८ वर्षीय पत्नी सुधा सप्रे यांनी केले. आजपासून नाचणे-पॉवरहाऊस येथील दैवज्ञ भवनमध्ये स्पर्धा सुरू झाली. चौथ्या फेरीअखेर नारायणन् श्रीनाथ, अमेय ऑडी, राकेश कुलकर्णी, राहुल संगमा, कांतिलाल दवे, सोहन फडके यांच्यासह अन्य सहा खेळाडू आघाडीवर होते.
रत्नागिरी : चेसमन आयोजित (कै.) आर. बी. सप्रे स्मृती
राष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी खेळाडू.
स्पर्धेचे उद्घाटन करताना श्रीमती सुधा सप्रे.
शेजारी दिलीप टिकेकर, चंद्रकांत हळबे, प्रसन्न आंबुलकर व सप्रे कुटुंबीय.
स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू आदी राज्यांतील २२६ खेळाडू सहभागी झाले आहेत. तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर नारायणन् श्रीनाथ, मध्य प्रदेशचा आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा, महिला फिडेमास्टर ऋचा पुजारी, कँडेडमास्टर विनोद भागवत, ठाण्याचे नूबेरशहा शेख, राकेश कुलकर्णी, हेमंत शर्मा, सोहन फडके, स्नेहल भोसले, एस. सॅमसन, पुण्याचा प्रतीक मुळ्ये, गोव्याचा अमेय आडी, मुंबईचा सी. एस. उन्नी, राजस्थानचा कांतिलाल दवे, कोल्हापूरचा अनिश गांधी, सम्मेद शेट्ये, अचल रस्तोगी, मुंबईचा हर्ष घाग, संजीव नायर, पुण्याचा सुनील वैद्य, रोहन जोशी, रवींद्र नरगुंदकर, गोव्याचा विल्सन क्रूझ, पुण्याचा सोहम दातार, रत्नागिरीचे विनय गांधी यांच्यासह ११६ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू यामध्ये खेळत आहेत.
उद्घाटनप्रसंगी मोहन सप्रे, सौ. मंगला सप्रे, सौ. शुभांगी पोळ, डॉ. प्रबोध पोळ, डॉ. अंजली मायदेव यांच्यासह चेसमनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनय गांधी, सचिव दिलीप टिकेकर, स्पर्धा समन्वयक व केजीएन सरस्वती ङ्काउंडेशनचे दिलीप नवरे, रायगड चेसमन असोसिएशनचे अध्यक्ष विलास म्हात्रे, चिफ ऑर्बिटर भरत चौगुले, èहाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष चंद्रकांत हळबे आदी उपस्थित होते. यंदा सप्रे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या स्पर्धेस महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रज्ञेश देवस्थळी यांनी सूत्रसंचालन केले.

..................

६ ते ८२ वयोगटाचे खेळाडू

स्पर्धेत सहा वर्षांच्या आदिती जाधवपासून ८२ वर्षांचे एल. पी. खाडिलकर अशा सर्व वयोगटातील खेळाडूंनी भाग घेतला आहे. रत्नागिरीकरांना बुद्धिबळपटूंचा रणसंग्राम पाहावयास मिळत असून, अनेकांची गर्दी होत आहे. रामचंद्र सप्रे यांचा नातू देवेंद्र मायदेव स्पर्धेत खेळत आहे. उद्या (ता. २९ नोव्हेंबर) दिवसभरात चार फेèया होणार असून, दुपारी ४ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

स्पर्धेत खेळताना खेळाडू