Thursday 10 December 2015

‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चे दुसरे पर्व १३ डिसेंबरपासून

छोटे तानसेन’ ‘कानसेनांनास्वरमुग्ध करणार

       रत्नागिरी : कोकणातील बालकलाकारांना ग्लॅमरस दुनियेची अनुभूती मिळावी, या हेतूने गेल्या वर्षापासून लिटील व्हॉइस ऑफ रत्नागिरीही १० ते १६ वयोगटातील मुलांसाठी गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सीझन २ मधील प्राथमिक फेऱ्यांची सुरुवात येत्या १३ डिसेंबरपासून चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक हॉल येथून होणार आहे.
आकर्षक रंगमंच, नेत्रदीपक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था यासोबतच नामवंत कालाकारांच्या वाद्यवृंदातील साथीने आपल्या गळ्यातील स्वर आळवण्याची अमूल्य संधी या स्पर्धेच्या निमित्ताने या बालकलाकारांना मिळणार आहे. आयोजक मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्सआणि दिल से क्रिएशन्सया रत्नागिरीतील नामवंत संस्थांमुळे एक अप्रतिम इव्हेंट रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे.
मोठ्या शहरांमधील कलाकारांना जी संधी मिळते तशी संधी कोकणच्या कलाकारांना मिळावी यासाठी मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्सचे अभिजित गोडबोले नेहमीच प्रयत्नशील असतात. हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि उद्योजक किरणशेठ सामंत यांच्या प्रेरणेतून आणि अभिजित गोडबोले यांच्या संकल्पनेतून सादर होत आहे. स्पर्धेची जिल्हास्तरीय अंतिम फेरी ७ जानेवारी २०१६ रोजी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे.
       चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड येथील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता यावे म्हणून स्पर्धेची पहिली निवड फेरी १३ डिसेंबर रोजी चिपळूण येथे लोकमान्य टिळक स्मारक हॉल येथे सकाळी ११ वाजता होईल. रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर येथील स्पर्धकांसाठी निवड फेरी रत्नागिरीत २५ डिसेंबर रोजी रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये होईल. या दोन्ही फेऱ्यांमधून १० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यसाठी स्पर्धकाला १ मराठी आणि १ हिंदी गाणे पाठ असणे अपेक्षित असून निवड फेरीच्या वेळी आपल्या आवडीचे कोणतेही गाणे स्पर्धक सादर करू शकतो. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील नामवंत कलाकारांची वाद्यवृंद साथ मिळाणार असून अंतिम फेरीसाठी स्पर्धकांकडून आवश्यक सराव करून घेतला जाणार आहे. गतवर्षीप्रमाणेच अंतिम फेरीच्या सोहळ्याला सेलिब्रेटींचीविशेष उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास  ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अभिजित गोडबोले (९९२२८६९०९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tuesday 8 December 2015

रासरंग कार्यक्रमाने रत्नागिरीकर श्रोते उपशास्त्रीय संगीतात न्हाले



रत्नागिरी : उपशास्त्रीय संगीतामधील दादरा, गझल, ठुमरी, चैती आदी नावीन्यपूर्ण व राग, थाटामध्ये रचलेल्या व विविध भावना व्यक्त करणाऱ्या गीतांनी रत्नागिरीकर श्रोत्यांना रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने आगळी संधी उपलब्ध करून दिली. प्रख्यात गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या रासरंग कार्यक्रमाने श्रोते उपशास्त्रीय संगीतात न्हाऊन गेले. शास्त्रीय, सुगम, भावगीतांपेक्षा वेगळ्या धाटणीचा हा कार्यक्रम श्रोत्यांच्या पसंतीस उतरला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात रासरंग कार्यक्रमात
गायन करताना सौ. मुग्धा भट-सामंत. शेजारी श्रीरंग भावे व
सौ. विनया परब. वाद्यसाथ हेरंब   जोगळेकर, उदय गोखले,
 वैभव ङ्कणसळकर आणि मधुसूदन लेले, निवेदिका सौ. पूर्वा पेठे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांच्यासमवेत श्रीरंग भावे आणि सौ. विनया परब यांनीही गायन करून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कल्लापाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक केतन शेट्ये, वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, कार्यवाह चंद्रशेखर पटवर्धन आणि गायकांनी सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन केले. अ‍ॅड. पटवर्धन यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले.
दीपप्रज्वलन करताना कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे
केतन शेट्ये. शेजारी अ‍ॅड. दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन आदी.
सौ. सामंत यांनी अखिया न डारो या गीतीने सुरवात केली व त्यानंतर केसरियां बालमा हा दादरा ऐकवला. त्यानंतर कब लो मैं रहूं खडी हे गीत श्रीरंग भावे यांनी ऐकवले. ऐकवून उपशास्त्रीय संगीतातील प्रकार ऐकवला. सौ. सामंत यांनी कारे कारे बादल, चैतर मासे घर आयो, होरी होरी होरी खेलत, धिरके आयी बदरियाँ, हुजूर इतन अगर, लई झुलन की, सावन की ऋतू, झुले झुले बगिया में, qबदिया का रंग, सुन्या सुन्या आदी विविध भावांनी रंगलेली गीते ऐकवून रसिकांची वाहवा मिळवली. तर श्रीरंग भावे आणि सौ. परब यांनीही गीते ऐकवली.
श्रीरंग भावे
कार्यक्रमात सौ. पूर्वा पेठे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. हेरंब जोगळेकर यांनी तबलासाथ, मधुसूदन लेले यांनी हार्मोनियम, उदय गोखले यांनी व्हायोलिन, वैभव ङ्कणसळकर यांनी qसथेसायजरसाथ केली.
 कार्यक्रमास रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. रत्नागिरीत सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्याकरिता सातत्याने नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल व वाचनालय त्यात योगदान देईल, असे असे अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी या वेळी सांगितले.

सौ. विनया परब