Saturday 26 September 2015

परतीच्या कोकण रेल्वे प्रवासात चाकरमान्यांना फसवणुकीमुळे भुर्दंड



बनावट तिकीट देणाऱ्या मुंबईतील एजंटाची करामत चार महिन्यांनी उघड

प्रमोद कोनकर
pramodkonkar@gmail.com


रत्नागिरी : मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव आटोपून कोकण रेल्वेने मुंबईला निघालेल्या काही चाकरमान्यांना एजंटांनी केलेल्या फसवणुकीचा फटका बसला. परतीच्या प्रवासात एजंटाने केलेल्या या फसवणुकीमुळे या प्रवाशांना मानहानी तर पत्करावी लागलीच, पण दंडासह तिकिटाच्या रकमेएवढ्या फरकाची रक्कम भरण्याचा भुर्दंडही सहन करावा लागला.
मंगळवारी (ता. २२) रात्री गोव्याहून मुंबईकडे निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी कणकवली स्थानकात पोहोचली. बी-४ या वातानुकूलित डब्यात विजय कुंटे आणि त्यांचे इतर पाच कुटुंबीय डब्यात चढले. कन्फर्म तिकीट आणि मनाजोगत्या जागा मिळाल्याने ते खुशीत होते. चार महिन्यांपूर्वी तिकिटासाठी केलेली धडपडीचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्यासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होते. याच समाधानात त्यांनी ट्रेन तिकीट एक्झॅमिनर अर्थात कंडक्टरला आपले तिकीट दाखविले. तिकीट तपासल्यानंतर टीटीईने त्यांना दंडासकट साडेपाच हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे कुंटे कुटुंबीय संतापलेच. टीटीईविरुद्ध कम्प्लेन्ट करण्याची धमकीही त्यांनी दिली. मात्र टीटीई बधला नाही. कारण तसेच होते. प्रवाशांनी सादर केलेले ८१३६०६३१०१ या पीएनआर क्रमांकाचे तिकीट आणि टीटीईकडे असलेल्या चार्टवरचा तपशील जुळत नव्हता. तिकिटावर प्रवाशांच्या नावासमोर ५१, ५०, ५६, ३६ आणि ३५ असे वय नमूद करण्यात आले होते, तर टीटीईकडच्या चार्टवर हेच वय अनुक्रमे ११, १०, ५, ६ आणि ५ असे दिसत होते. साहजिकच हे सर्व प्रवासी लहान मुले असल्याचे टीटीईचे म्हणणे होते. तिकिटाची रक्कमही निम्मीच भरल्याचे दिसत होते. राहिलेली निम्मी रक्कम आणि दंडासह साडेपाच हजार रुपये भरायला टीटीईने सांगितले. त्यावरून डब्यात मोठाच गोंधळ झाला. दंड थोपटले गेले. मात्र टीटीई ठाम राहिल्याने प्रवाशांना दंड भरावाच लागला.
माहिती घेतल्यानंतर स्पष्ट झाले की, हे तिकीट श्री. कुंटे यांनी लालबाग (मुंबई) येथील एजंटाकडून चार महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. एजंटाने आयआरसीटीसीमार्फत काढलेल्या या तिकिटाच्या प्रिंटमध्ये घोळ केला. प्रवाशांना दिलेल्या तिकिटावर योग्य तो तपशील लिहिला, मात्र आयआरसीटीसीवर नोंद करताना चुकीचा तपशील लिहिला. प्रत्येक प्रवाशाचे वय १२ वर्षांपेक्षा कमी लिहिले. परिणामी सर्वच प्रवासी मुले ठरली. तेवढीच अधिकृत नोंद अंतिम चार्टमध्ये झाली. प्रवाशामागे ३०० रुपये या दराने १८०० रुपये श्री. कुंटे यांनी आधीच एजंटाला दिले होते. त्याशिवाय कमी रकमेच्या तिकिटामुळे साडेपाच हजाराचा भुर्दंड रेल्वेला भरावा लागला. त्यामुळे ८३५ रुपयांचे प्रतिमाणशी असलेले तिकीट त्यांना दुपटीहून अधिक रकमेला पडले.

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून श्री. चंद्रकांत कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये कणकवली स्थानकावर चढले. बी-१ डब्यातल्या ५७ क्रमांकाच्या आपल्या आसनापर्यंत ते पोहोचले. बघतात तर तेथे एक प्रवासी आपलीच सीट असल्याच्या थाटात आधीच स्थानापन्न झाला होता. श्री. चंद्रकांत खवळलेच. त्यांनी त्या प्रवाशाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मग दोघांनीही आपापली तिकिटे एकमेकांना दाखवली आणि दोघेही चक्रावलेच. कारण दोघांच्याही तिकिटावर एकच आसन क्रमांक लिहिलेला होता.
अखेर दोघांनीही टीटीईकडे धाव घेतली. टीटीईने आपला चार्ट पाहिला आणि आधीच बसलेल्या प्रवाशाचे तिकीट अधिकृत असल्याचे सांगून त्याच्या बाजूने आपला कौल दिला. तिकिटावरचा आणि चार्टवरचा तपशील जुळत नव्हताच. त्यामुळे श्री. चंद्रकांत संतापले. ``एकाच सीटचे तिकीट दोघांना देऊन रेल्वेने एसटीसारखाच घोळ घातला आहे. ते काही मला माहीत नाही. मला माझी सीट द्याच``, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर टीटीईने त्यांचे तिकीट तपासले. पीएनआर ८७३४९१९४९२ क्रमांकाच्या या तिकिटाची खातरजमा त्यांनी रेल्वेच्या १३९ या क्रमांकावर केली. तेव्हा उत्तर आले की या हे तिकीट दुसऱ्या दिवशी सुटणाऱ्या गाडीचे आहे! चंद्रकांत यांना एजंटाने दिलेले तिकीट बनावट होते. खऱ्या पीएनआरचे दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाचे तिकीट दुसऱ्याच प्रवाशाला विकले गेले होते. श्री. चंद्रकांत यांना अखेर माघार घ्यावी लागली. गणेशोत्सव आटोपून पुन्हा मुंबईला जायचा प्रवास सुखाचा व्हावा, म्हणून तिकिटाच्या ८३५ रुपयांपेक्षा जादा ३०० रुपये देऊन त्यांनी चार महिन्यांपूर्वी हे तिकीट खरेदी केले होते. सुखाच्या प्रवासाचा त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आपण एजंटाकडून फसवले गेलो आहोत, हे समजेपर्यंत रत्नागिरी स्थानक आले होते. एजंटाला भरलेले ते सर्व पैसे गेलेच, पण विनातिकीट प्रवासी समजून संपूर्ण तिकिटाचे पैसे आणि दंडाची रक्कम मिळून जादा १२०० रुपये त्यांना भरावे लागले.
कोकणकन्या एक्स्प्रेस या सर्वाधिक लोकप्रिय गाडीत एकाच दिवशी केवळ वातानुकूलित डब्यात अशा पद्धतीने सहा तिकीटधारक प्रवाशांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. चाकरमान्यांच्या परतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी सहा दिवस दररोज सुमारे ३० जादा गाड्या धावणार आहेत. त्या प्रत्येक गाडीतील  अनेक प्रवाशांची अशा तऱ्हेने फसवणूक झालेली असू शकेल.
.....

फसवणूक रेल्वेच्या पथ्यावर?
प्रवाशांची अनधिकृत एजंटांकडून झालेली ही फसवणूक एक प्रकारे रेल्वेच्या पथ्यावरच पडली आहे. एकदा गाडीत चढलेले प्रवासी गाडीतून उतरण्याच्या आणि गर्दीच्या गाडीतून पुन्हा प्रवासाचे दिव्य करण्याच्या मन:स्थितीत नसतात. ते प्रवासी दंड आणि फरकाची रक्कम भरून त्याच गाडीने प्रवास करण्याला पसंती देतात. झोपायला किंवा बसायला जागा नसली, तरी त्यांची हरकत नसते. अशा स्थितीत प्रवाशाला सीट न देताच दंड आणि तिकिटाची रक्कम रेल्वेला आपसूकच मिळत असते.


दोन्ही तिकिटांवर एकच मोबाइल
फसवणूक झाल्याचे उघड झालेल्या आणि एकमेकांना ओळखत नसलेल्या दोन वेगवेगळ्या प्रवाशांच्या तिकिटावर प्रवाशाचा मोबाइल क्रमांक या रकान्यात ८४५२९७७७७२ हाच क्रमांक आहे. या क्रमांकावर फोन लावल्यास तो उचलला जात नाही. तसेच परळ (पूर्व), मुंबई – १२ हा एकच पत्ता त्या दोन्ही तिकिटांवर आहे. हे सारेच संशयास्पद आहे.


प्रवाशांनी तिकिटाची खात्री करावी
रेल्वेने रीतसर परवाना देऊन अधिकृतपणे सिटी बुकिंगसाठी एजंट नेमले आहेत. त्यांच्याकडून अशी फसवणूक होण्याची शक्यता नाही. आयआरसीटीसीवरून सहज तिकिटे मिळत असल्याने अनधिकृत एजंट अशा तऱ्हेची फसवणूक करू शकतात. प्रवाशांनी तिकीट ताब्यात घेतल्यानंतर पीएनआरच्या मदतीने वेबसाइटवरून किंवा मोबाइलवरून एसएमएसवरून आपल्या तिकिटांची आणि इतर तपशिलाची खात्री करून घ्यावी. तसे केल्यासच अशा तऱ्हेची फसवणूक टळू शकेल. फसल्या गेलेल्या प्रवाशांनी रेल्वेशी संपर्क साधल्यास एजंटाचा तपास करून कारवाई करता येऊ शकेल. खासगी एजंटांकडून तिकीट खरेदी केलेल्या मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच चाकरमान्यांनी आपल्या तिकिटाची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
- बाळासाहेब निकम,
आरआरएम, कोकण रेल्वे,
रत्नागिरी स्थानक
.......................................................

 (प्रसिद्धी - सकाळ, तरुण भारत, लोकमत- रत्नागिरी आवृत्ती, ता. २५-९-२०१५)
 






Sunday 20 September 2015

आईचं मुलाला (सोशल मीडियावर) पत्र.... (adz91 च्या सौजन्याने)

पाठ्यपुस्तकातील `दिनूचे बिलधड्याची आठवण करून देणारी घटना

मराठी पाठ्यपुस्तकामधील `दिनूचे बिलनावाचा धडा अनेकांनी वाचला असेल. या धड्याची आठवण करून देणाऱ्या एका पत्राची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. हे पत्र आईने मुलाला लिहिले आहे. वाचा हे पत्र.
.............


स्वातंत्र्याचा धडा

     मी आता कमवायला लागलोय आणि स्वतंत्र आहे असं सांगणा-या १३ वर्षांच्या मुलाला युरोपमधल्या वैतागलेल्या आईने स्वातंत्र्याचा धडा नावाचं एक पत्र लिहिलं आणि आपल्या भावनांना मोकळं व्हायला वाव दिला. फेसबुकवरल्या त्या पत्राला लाखाच्या घरात समदु:खी मातांनी व नेटिझन्सनी शेअर केलं असून ही समस्या घराघरात कशी शिरलीय याची चुणूक दाखवली आहे.
      इस्टेला हाविशम असं सिंगल पेरेंट असलेल्या या महिलेचं नाव असून अरॉन असं तिच्या मुलाचं नाव आहे. अरॉन आईला एक रुममेटसारखी वागणूक देतो आणि तिचे नियम पाळण्यास नकार देताना मी यू ट्यूबवर पैसे कमवू शकतो. मी स्वतंत्र आहे आणि गृहपाठअभ्यास वगैरे गोष्टींची अपेक्षा बाळगू नको आदी सांगतो.
     वैतागलेल्या इस्टेला फेसबुकचा आधार घेतात आणि मुलाला उद्देशून पत्र लिहितात. तू स्वत:ला स्वतंत्र समजतोस नामग खोलीचं भाडंविजेचा खर्चइंटरनेटचा चार्ज आणि अन्नाची किंमत या गोष्टीदेखील दे असं त्या पत्रात लिहितात.
राहण्यापोटी ४३० डॉलर्सविजेच्या बिलापोटी ११६ डॉलर्सइंटरनेचसाठी २१ डॉलर्स आणि जेवणाचे १५० डॉलर्स एवढा खर्च येतो. वेळच्यावेळी साफसफाई कर अन्यथा त्यासाठी ३० डॉलर्स द्यावे लागतील, असंही ती पुढे म्हणते.
    मुलासाठी आपण काय काय विकतं घेतलं याची जंत्रीही त्यांनी दिली आहे.
    पत्राचा समारोप करताना एक रूममेट म्हणून न राहता तुला पुन्हा माझं मूल म्हणून राहायचं असेल तर वर दिलेल्या अटींचा आपण पुनर्विचार करू, असंही इस्टेला सुचवतात आणि मुलाच्या मनपरिवर्तनाची आशा बाळगतात.
    गेल्या आठवड्यात त्यांनी हे पत्र लिहिलं आणि ते अक्षरश: लाखांच्या संख्येनं शेअर झालंत्याची चर्चा झाली.
   आता ताज्या पोस्टमध्ये इस्टेला म्हणतातया पोस्टनंतर मुलाच्या वागणुकीत बदल झालाय आता मी त्याला काही सांगितलं तर तो ऐकतो...

..............
ही बातमी adz91 या मोबाइल अॅपवर प्रसिद्ध झाली आहे.
या आणि अशा बातम्या देणारे
तसेच जाहिरात पाहिल्याबद्दल पैसे मिळवून देणारे
adz91 हे अॅप आपणही अवश्य डाऊनलोड करून घ्या.
अधिक माहितीसाठी http://adz91ratnagiri.blogspot.in या ब्लॉगला अवश्य भेट द्या. या ब्लॉगवरील सुरुवातीच्या पोस्टमध्ये अॅपविषयी तसेच डाऊनलोड करण्यासंबंधीची माहिती आहे.



Friday 18 September 2015

चारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट उपाधी बहाल

नाशिक येथे  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कीर्तनकार
चारुदत्तबुवा आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट ही उपाधी, मानपत्र देताना
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज.
नाशिक : राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट अशी उपाधी बहाल केली. आफळेबुवांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजजागरणाबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला. रामानंदाचार्यांच्या दक्षिणपीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन आफळेबुवांना गौरवण्यात आले.
येथील साधूग्राममधील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नगरात हा सोहळा झाला. कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची नगरात रोज वेगवेगळ्या विषयांवर कीर्तने होत आहेत. त्यांचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा व्यासंग दांडगा आहे. आपल्या रसाळ वाणीतील कीर्तनाने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. आजपर्यंतच्या त्यांच्या या कार्याची दखल नरेंद्राचार्यजी महाराज यांनी घेऊन त्यांना ही उपाधी दिली.
यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे पुरोहित वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी, कौस्तुभ शौचे गुरुजी, स्वामीजींचे भक्त-भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      सत्काराला उत्तर देताना आफळेबुवा म्हणाले, माझ्या कामाची दखल जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी घेतली. मी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. महाराजांचे qहदुत्वाचे काम सर्वोच्च आहे. स्पष्ट बोलण्याची हिंमत स्वामीजींच्याकडे आहे. त्यांचे घरवापसीचे काम फार मोठे आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून क्रांतीकारी संत, देशभक्त, क्रांतिकारक यांची चरित्रे सांगतो. त्याद्वारे राष्ट्रप्रेम जागवण्याचे काम मी आजपर्यंत केलेले आहे. त्यामुळेच स्वामीजींनी केलेल्या गौरवाने मी कृतकृत्य झालो आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे.

Thursday 17 September 2015

कॅमेरा आणि मेमरी कार्ड मिळवा 60 टक्के सवलतीत

सोबतच्या लिंकचा वापर करून ऑनलाइन खरेदी केल्यास

कॅमेरा तसेच मेमरी कार्ड आणि डिजिटल कॅमेराशी संबंधित अॅक्सेसरीज ६० टक्क्यांपर्यंत सवलतीत मिळू शकतील.

अवश्य भेट द्या.

http://www.snapdeal.com/products/cameras?utm_source=aff_prog&utm_campaign=afts&offer_id=17&aff_id=37250